शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

पावसाळापूर्व साफसफाईच्या ठेक्यांना 'हँगओव्हर'चा फटका; अनेकांच्या निविदा लटकल्या!

By नारायण जाधव | Published: April 01, 2024 4:14 PM

मुदतवाढ देण्याची ठेकेदारांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पावसाळ्यात शहरांत गटारे, नाले तुंबून कोठेही पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई महापालिकेकडून दरवर्षी आपल्या हद्दीत साफसफाई करण्यात येते. त्यानुसार महापालिकेेने यंदाही अशा साफसफाईची १०० हून अधिक कामे काढली आहेत. १ एप्रिल २०२४ ही त्यासाठी अखेरची मुदत होती; मात्र सोमवारी सकाळपासूनच अनेक ठेकेदारांना महा टेंडरसह स्टेट बँकेच्या वेबसाईटवर निविदा भरण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. अनेकांना वेबसाईट हँग-ओव्हरचा झाल्याने निविदा भरता आली नसल्याच्या तक्रारी करून मुदतवाढ देण्याची मागणी केली.

शहरात एमआयडीसी आणि झोपडपट्टी परिसरात नाल्यांची संख्या मोठी आहे. तसेच सिडकोने बांधलेली पावसाळी गटारे आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास साचणारे पाणी या गटारे आणि नाल्यांद्वारे ठाणे खाडीला मिळते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका दरवर्षी त्यांची नित्यनियमाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच साफसफाई करते. त्यानुसार यंदा यासाठी निविदा भरण्याचा सोमवारी शेवटची मुदत होती; मात्र सकाळपासूनच १०० च्यावर असलेल्या कामांच्या निविदा भरण्यासाठी ठेकेेदारांनी वेबसाईट उघडल्या असता अनेकांना कागदपत्रे, स्टॅम्पपेपर सबमिट करण्यास अडचणी आल्या. अनेकांनी वेबसाईट हँग होत असल्याची, स्लो झाल्याच्या तक्रारी केल्या. यामुळे या निविदा भरण्यास आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली.

पावसाळापूर्व साफसफाईच्या निविदा भरण्याची सोमवारी शेवटची मुदत होती; मात्र वेबसाईट हँग होणे किंवा स्लो चालणे यात नवी मुंबई महापालिकेची कोणतीही चूक नाही. आमच्या निविदा महाटेंडरद्वारे स्वीकृत करण्यात येतात. यामुळे महाटेंडर आणि स्टेट बँक यांच्या वेबसाईटशी महापालिकेेचे कोणतेही देणे-घेणे नाही.-डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसNavi Mumbaiनवी मुंबई