नवी मुंबईतील सायन्स पार्क प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By योगेश पिंगळे | Published: January 4, 2024 06:28 PM2024-01-04T18:28:38+5:302024-01-04T18:29:57+5:30

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच अत्याधुनिक प्रकल्प व कामांमुळे नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या नावलौकीकात लक्षणीय भर घालणारा प्रकल्प नेरुळ ...

The science park project in Navi Mumbai should be of international standard, instructions to the officials of the commissioner | नवी मुंबईतील सायन्स पार्क प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नवी मुंबईतील सायन्स पार्क प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच अत्याधुनिक प्रकल्प व कामांमुळे नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या नावलौकीकात लक्षणीय भर घालणारा प्रकल्प नेरुळ सेक्टर १९ येथे वंडर्स पार्कनजिक उभारला जात असून हा सायन्स पार्क प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा व या माध्यमातून नवी मुंबई शहराची ओळख देशपातळीवर अधोरेखित व्हावी असा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रकल्प स्थळाची पाहणी करुन कामाची सदयस्थिती जाणून घेतली व नियोजनबध्दरित्या विहीत वेळेत काम पूर्ण करुन घ्यावेत असे निर्देश दिले.

वंडर्स पार्क हे नागरिकांचे व पर्यटकांचे नवी मुंबईतील विशेष आकर्षण केंद्र असून त्या शेजारी १९ हजार ५०० चौ.मी. च्या बांधकाम क्षेत्रात उभारला जाणारा सायन्स पार्क सारखा प्रकल्प नाविन्यपूर्ण होण्यासाठी बांधकाम रचनेपासून त्याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या विज्ञान विषयक सुविधांपर्यंत सर्वच बाबींमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाईल असे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यादृष्टीने देशातील अशा प्रकारच्या वैशिष्टयपूर्ण सायन्स पार्क्सना भेट दयावी, त्यांची पाहणी करावी व त्यापेक्षा अधिक अदययावत आणि आधुनिक सुविधांनी युक्त सायन्स पार्क निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे आयुक्तांनी निर्देशित केले. नुकत्याच नवी मुंबईत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात उपस्थित देशभरातील अनेक नामांकित शास्त्रज्ञांनी नवी मुंबई महापालिकेच्या सायन्स पार्क प्रकल्पाविषयी उत्सुकता दाखविली होती. त्याचप्रमाणे अनेक शास्त्रज्ञांनी यामध्ये वैचारिक योगदान देण्याची इच्छा व्यक्त्‍ केली होती. त्या अनुषंगाने राज्यातील व देशातील नामांकित शास्त्रज्ञांचे वैचारिक मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने यापुढील काळात सकारात्म्क कार्यवाही केली जाईल असे आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले. हा सायन्स पार्क अनुभवसंपन्न शास्त्रज्ञांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा होण्यासाठी मदतच लाभणार आहे.

या सायन्स पार्कच्या आराखडयाचे बांधकाम ९० टक्के हून अधिक पूर्ण झाले असून बांधकाम पूर्णत्वासोबतच समांतरपणे अंतर्गत भागातील सजावट व त्याठिकाणी प्रदर्शित करण्यात येणारे विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत मॉडेल्स, थ्री डी इमेजेस, ऑडियो व्हिज्युअल फिल्म्स यांचेही काम समांतरपणे सुरु ठेवण्याचे आयुक्तांनी सूचित केले. येथे जीवशास्त्राशी संबंधित विभाग, पर्यावरणाशी संबंधित विभाग, ऊर्जेशी संबंधित विभाग, यांत्रिकीकरणाशी संबंधित विभाग, अंतराळाशी सबंधित विभाग अशा विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित वेगवेगळया विभागांतून सहजसोप्या पध्दतीने विज्ञानाची मांडणी केली जाणार आहे. या सर्व विभागांची मांडणी, रचना व त्याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सुविधा या उपस्थितांशी जास्तीत जास्त संवादी असतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. येथील प्रत्येक विभागामध्ये वैशिष्टयपूर्ण पध्दतीने तो विषय सहजपणे समजू शकेल अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल्स, एक्झिबिट्स, ऑडिओ व्हिज्युअल फिल्म्स यांची रचना केली जाणार असून त्या दृष्टीने साहित्य निवड करावी व त्याचे पुन्हा एकवार सादरीकरण करावे असे आयुक्तांनी सूचित केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता संजय देसाई, वास्तुविशारद हितेन सेठी तसेच संबंधित अभियंता उपस्थित होते.

वंडर्स पार्क परिसरालाही सुशोभित करा
सायन्स पार्कसारखा अभिनव प्रकल्प उभारला जात असताना शेजारील वंडर्स पार्क परिसरालाही त्याच गुणात्मक रितीने सुशोभित करावे असे निर्देश देत सायन्स पार्कमधील प्रत्येक गोष्ट ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व इतरांपेक्षा नाविन्यपूर्ण असण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्त नार्वेकर यांनी दौ-याप्रसंगी नमूद केले.

Web Title: The science park project in Navi Mumbai should be of international standard, instructions to the officials of the commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.