वैभव गायकर
पनवेल - तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणाचा विषय नवीन नाही.या प्रदूषणाचा फटका तळोजा नोड लगतच्या शहरांना बसु लागला आहे.असे असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तळोजा एमआयडीसी मधून वाहणाऱ्या कासाडी नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसत असुन नदीपात्रातील दगडांचा रंगही प्रदूषणामुळे समोर आले आहे.
नावडे फाटा याठिकाणी खराब प्रदूषित पाण्यामुळे नदीतील खडक काळवंडले आहे. काही ठिकाणी दगडांचा रंगही लालसर झाल्याचे दिसून येत आहे.तळोजा एमआयडीसी मध्ये जवळपास 900 कारखाने आहेत.यामध्ये 300 च्या आसपास रासायनिक कारखाने आहेत.कासाडी नदी प्रदूषणावरून स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी यापूर्वीच राष्ट्रीय हरित लवाद मध्ये धाव घेतली आहे.प्रदूषणाच्या विषयावरून वेळोवेळी राष्ट्रीय हरित लवादाने एमपीसीबी तसेच इतर प्राधिकारणांचे कान टोचले आहेत.अद्यापही हा विषय न्यायालयात असताना प्रदूषणावर हव्या त्या पद्धतीने नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला अपयश आले आहे.नदीपात्रातील जीवशृष्टी धोक्यात आली असताना नदीपात्रातील खडक आणि दगडांचा रंगही बदलत चालला असल्याने प्रदूषणाचा घातक रूप पुढे आला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत आयआयटी बॉंबे ने आपला शोकडो पानांचा रिपोर्ट मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी रायगड यांना सादर केला आहे. या रिपोर्ट मध्ये तळोजा प्रदूषणामधील प्रदूषणाचा परिणाम,प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्याआजार आदी सर्वांचा सविस्तर अहवाल बारकाईने मांडला आहे.शेकडो पानांच्या या अहवालात अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. चला जानूया नदीला या अभियाना अंतर्गत कासाडी नदी संवर्धनासाठी 15 कोटींचा निधीमंजूर झाला आहे.मात्र अद्याप याबाबत कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने अरविंद म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून याबाबत तत्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. तळोजा मधील प्रदूषणांबाबत एमईपीसीबीचे अधिकारी विक्रांत भालेराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे दिसून आले.
प्रतिक्रिया -घातक केमिकलमुले दगड ,माती यांच्यावर परिणाम झाला आहे.आयआयटीचा रिपोर्ट आहे.या रिपोर्ट मध्ये सर्व नमूद आहे.दगड आणि मातीवर परिणाम होत असेल तर सर्व मानवी जीवनावर याचे किती घातक परिणाम होतील ? याबाबत विचार करण्याची गरज आहे.शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत गांभीर्याने विचार न केल्यास भविष्यात याचे घातक परिणाम सर्वाना भोगावे लागतील.- अरविंद म्हात्रे (तळोजा प्रदूषण ,याचिकाकर्ते )