नवी मुंबई :पोलिस पत्नीने पोलिस कुटुंबीयांचीच आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फंडाच्या नावाने परिचयाच्या पोलिस कुटुंबीयांकडून पाच वर्षात ८२ लाख जमा करून घेतले होते. मात्र, त्यांची परतफेड न करता फसवणूक करून तक्रारदार यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.
सीबीडी येथील पोलिस वसाहतीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या पोलिस पत्नीने २०१९ मध्ये फंड सुरू केला होता. या फंडातून अधिक नफा मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल
पोलिस वसाहतीतीली पोलिस कुटुंबातील महिला, पुरुषांनी त्यांच्याकडे पैसे भरले होते. चार वर्षांनी मुदत संपल्यावर संबंधितांनी त्यांच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली असता त्यांनी टाळाटाळ केली. पाठपुरावा केल्यावर शिवीगाळ होऊ लागल्यामुळे गुंतवणूकदारांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात १६ लाख ५८ हजार महिलांनी, तर ६५ लाख ५० हजार पुरुषांनी भरले आहेत.