मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे
By नारायण जाधव | Published: January 26, 2024 03:36 PM2024-01-26T15:36:41+5:302024-01-26T15:37:35+5:30
कुणी पायी कुणी बाईकने तर कुणी चारचाकीने वाशीकडे कुच करीत होते. ऐरवी २६ जानेवारीला रिकाम्या धावणाऱ्या लोकल ओसंडून वाहत होत्या.
काल रात्रीपासूनच नवी मुंबईतील प्रत्येक रस्ते एपीएमसी मार्केट तर सकाळी नऊ नंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे. कुणी पायी कुणी बाईकने तर कुणी चारचाकीने वाशीकडे कुच करीत होते. ऐरवी २६ जानेवारीला रिकाम्या धावणाऱ्या लोकल ओसंडून वाहत होत्या.
सोलापूरहून आलेला अमित देशमुख आपल्या म्हणत होता मनोजदादाने माघार घ्यायलाच नको. अभि नही तो कभी नही. सरकारला झुकवायलाच पाहिजे. तर जालनातील सुनील काळे म्हणत होता. आता माघार नकोच. पुन्ह्यांदा मुंबंईत अशी गर्दी जमणार नाही. सरकारला झुकवायचे असेल तर गर्दीचा जोर हवाच. सरकारची कोरडी आश्वासन नकोच.
बीडचा तुकाराम लहाने म्हणाला या खेपेला आरक्षण घेऊनच परतायचे आहे. माघार नाहीच. परभणीच्या सखुबाई चौधरी म्हणाल्या आवं साहेब आम्हासणी आरक्षण काय ते काही ठावं नव्हतं. पण पोरगं मोठं झाल्यावर त्याच्या तोंडून ऐकलं चांगलं गुण मिळवूनही कालेजात ॲडमिशनला लई त्रास झाला. तर पोरगीची सरकारी नोकरी मिळेना.
माह्या पोरांना हा त्रास झाला. दुसऱ्याना नको म्हणून आले बघा. नगरच्या लता पाटील म्हणाल्या आसं वाटु राहलंय की आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन गुन्हा केला की काय? यातून सर्वांचा एकच सूर दिसला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच. अभी नही तो कभी नही.