परिवहनच्या ताफ्यात ३० इलेक्ट्रिक बसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:42 PM2019-07-14T23:42:39+5:302019-07-14T23:42:50+5:30

महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच ३० इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे.

There are 30 electric buses in the fleet of transport | परिवहनच्या ताफ्यात ३० इलेक्ट्रिक बसेस

परिवहनच्या ताफ्यात ३० इलेक्ट्रिक बसेस

Next

नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच ३० इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. केंद्र सरकारच्या फेम योजनेअंतर्गत या बसेस उपलब्ध होणार असल्याची माहिती ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी दिली.
सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ४७७ बसेस आहेत. यात १३० सीएनजीवर चालणाऱ्या आहेत, तर २५ वातानुकूलित आहेत. नवी मुंबईसह मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी भागात या बस धावतात. बेस्टच्या भाडेकपातीनंतर एनएमएमटीच्या दैनंदिन तोट्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकूणच महापालिकेचा परिवहन उपक्रम डबघाईला निघाला असून नव्याने येणाºया इलेक्ट्रिक बसेसमुळे दैनंदिन तोट्यात घट होईल, असा विश्वास व्यवस्थापनाला वाटत आहे.

Web Title: There are 30 electric buses in the fleet of transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.