पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या नाहीत

By admin | Published: January 16, 2016 12:35 AM2016-01-16T00:35:58+5:302016-01-16T00:35:58+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा आगामी पावसाळ्यापर्यंत

There are no new entangles until the monsoon | पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या नाहीत

पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या नाहीत

Next

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा आगामी पावसाळ्यापर्यंत पुरावा यादृष्टीने सर्वंकष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत नवीन नळ जोडण्या न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणातून महापालिका नवी मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करते. त्यानुसार मोरबे धरणातून दिवसाला साधारण ४२८ एमएलडी पाणी घेतले जाते. असे असले तरी गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने धरणाची पातळी खालावली. सध्या पुढील तीन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत १९ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला आता ३00 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वीच्या पाणीपुरवठ्यात १२८ एमएलडी पाण्याची कपात करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ४00 अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
पाण्याचा स्वैर वापर करणाऱ्या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे करीत असताना पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या न देण्याचा
निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)

- नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १ लाख २२ हजार अधिकृत नळजोडण्या आहेत. ९७२ किमी लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे या नळजोडण्यांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु सध्या १९ टक्के पाणीकपात केल्याने ग्राहकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याचा परिणाम म्हणून अनेक वसाहतींना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषत: एमआयडीसी परिसरातील झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या भेडसावताना दिसत आहे.

Web Title: There are no new entangles until the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.