उरण तालुक्यात बहुरंगी लढत

By admin | Published: February 20, 2017 06:18 AM2017-02-20T06:18:32+5:302017-02-20T06:18:32+5:30

तालुक्यातील ४ जि.प. आणि पंचायत समितीच्या ८ अशा एकूण १२ जागा जिंकण्यासाठी विविध राजकीय पक्षात जोरदार घमासान

There is a multi-colored fight in Uran taluka | उरण तालुक्यात बहुरंगी लढत

उरण तालुक्यात बहुरंगी लढत

Next

उरण : तालुक्यातील ४ जि.प. आणि पंचायत समितीच्या ८ अशा एकूण १२ जागा जिंकण्यासाठी विविध राजकीय पक्षात जोरदार घमासान लढाई सुरू झाली आहे. सेना, भाजपा, मनसे स्वबळावर तर शेकाप - काँग्रेस आघाडी अशी चौरंगी तर काही ठिकाणी अपक्षांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत बहुरंगी चुरशीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत.
नवघर जि.प. मतदार संघ सर्वसाधारण उमेदवारांसाठी राखीव आहे. या मतदार संघात अभय पाटील (अपक्ष), विजय भोईर (सेना), गोपाळ पाटील (अपक्ष), शर्मिला कोळी (अपक्ष),वैशाली घरत (शेकाप-काँग्रेस), संगीता प्रशांत पाटील (भाजपा) आदी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये तीन अपक्षांचा समावेश आहे. मात्र खरी लढत सेनेचे माजी उपसभापती विजय भोईर, माजी राजिप सदस्या वैशाली घरत (शेकाप-काँग्रेस) संगीता पाटील (भाजपा) आणि अपक्ष उमेदवार गोपाळ पाटील यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. नवघर पंचायत समिती गण सर्वसाधारण उमेदवारांसाठी आरक्षित आहे. या गणातून महादेव बंडा (शेकाप), दीपक ठाकूर (सेना), शेखर तांडेल ( भाजपा) अशी तिरंगी लढत होत आहे. तर भेंडखळ पंचायत समितीच्या सर्वसाधारण आरक्षित गणातून पद्माकर पाटील (भाजपा), रजत ठाकूर (अपक्ष), हिराजी घरत (सेना), मिलिंद पाटील (काँग्रेस), हेमंत भोंबले (भाजपा) असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जासई जि.प. गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. पुनर्रचना झालेल्या या जि.प. मतदार संघात कुंदा ठाकूर (काँगे्रस-शेकाप), रजनी ठाकूर (सेना), श्वेता मढवी (भाजपा) अशी तिरंगी लढत होत आहे. जासई पंचायत गण नामाप्र पुरुष उमेदवारासाठी राखीव आहे. येथे गुरुनाथ घरत (सेना), नरेश घरत (शेकाप), सुनील घरत (भाजपा) अशी तिरंगी लढत होत आहे. तर नामाप्र-महिलांसाठी आरक्षित असलेल्या विंधणे पंचायत गणात सुमन पाटील (काँग्रेस), दिशा पाटील (भाजपा) अशी सरळ लढत होत आहे. चिरनेर जि.प. गट सर्वसाधारण-पुरुष उमेदवारांसाठी आरक्षित आहे. या जि.प. गटात बाजीराव परदेशी (काँग्रेस), संतोष ठाकूर (सेना), रुपेश पाटील (मनसे), चंद्रहास म्हात्रे (अपक्ष),प्रदीप ठाकूर (भाजपा) असे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या आवरे पंचायत गणात समिधा म्हात्रे (शेकाप), हर्षदा ठाकूर (सेना), कांचन पाटील (मनसे) असे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून तिरंगी लढत अपेक्षित आहे.
चाणजे जि.प. गट सर्वसाधारण-महिलांसाठी आरक्षित आहे. या गटात वंदना कोळी (शेकाप), गीता भगत (सेना), रीना घरत (भाजपा) अशी तिरंगी लढत होणार आहे. चाणजे पंचायत गण सर्वसाधारण उमेदवारांसाठी आरक्षित आहे. या गणातून दीपक चिवेलकर (भाजपा), सागर कडू(शेकाप), अमिताभ भगत (सेना) असे तीन प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून बलाढ्य उमेदवारांमुळे चुरशीची तिरंगी लढत अपेक्षित आहे. केगाव पंचायत गण सर्वसाधारण-महिलांसाठी आरक्षित आहे. या गणात वैशाली पाटील (शेकाप), नीलम पेडवी (भाजपा), स्रेहा पाटील (सेना) असे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाच्या नीलम पेडवी वगळता अन्य उमेदवार नवख्या आहेत. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहाणार आहे. (वार्ताहर)

वडखळमध्ये चौरंगी लढत
1पेण : निवडणुकीचा प्रचार थंडावला असून राजकीय पक्षांच्या छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. पेणच्या सर्व जिल्हा परिषद गटात वैकुंठ पाटील विरुध्द शेकापचे प्रमोद पाटील ही राजकीय दंगल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या गटातील रावे वगळता सर्वच समावेश असलेल्या दादर, सोनखार, कहवे, जोहे, हमरापूर, वरेडी, अंजोरा, पाटणोली, कणे, काळेश्री या ग्रामपंचायतीवर शेकापने घेतलेल्या आघाडीमुळे ही लढत रंगतदार ठरली आहे. याच गटातील दादर गणात पं.स. सभापती आरक्षणाचा उमेदवार असल्याने प्रभागाला आरक्षणातील समाविष्ट झालेल्या ग्रा.पं. शेकापकडे आहेत. वडखळ जि.प.गटातील चौरंगी लढत भाजपा, शिवसेना, शेकाप व राष्ट्रवादी या चार पक्षांमध्ये होणार आहे. या गटात तब्बल ५,००० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. २९,९५२ एकूण मतदार धरल्यास त्यामधून ५००० मते वगळल्यास १७००० मतदान होणार आहे.
2पूर्वाश्रमीचे शिवसेना उमेदवार संजय जांभळे हे भाजपाकडून तर शिवसेनेकडून अविनाश म्हात्रे लढत आहेत. शिवसेनेच्या मतदारांमध्ये संजय जांभळे धक्कातंत्राने बदल घडवू शकतात तर काँग्रेसचा उमेदवार असल्याने शेकापचा वतीने प्रभाकर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिते या पारंपरिक शेकापच्या गटात शेकापचे डी.बी. पाटील लढत असून जिते व वाक्रुळ या गणावर शेकाप आ. धैर्यशील पाटील यांचा वरचष्मा कायम आहे. प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार जगदीश ठाकूर व भाजपाचे संदीप घरत हे आहेत. या गटातील जिते गणात शेकापच्या उमेदवार कविता डंगर विरुध्द शिवसेनेच्या मालती म्हात्रे यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. वाकु्र ळ गणात शेकापच्या रुचिता पाटील व काँग्रेसच्या नम्रता फाटक रिंगणात आहेत.

3पाबळ गटात आ. धैर्यशील पाटील यांच्या अर्धांगिनी अ‍ॅड. नीलिमा पाटील उभ्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवार रंजना मुंढे व भाजपाच्या मेघा आंबेकर विरोधात आहे. यातील कामार्ली गणात शेकापचे नीळकंठ दिवेकर तर पाबळ गणात सुनील गायकर असे तीन उमेदवार आहेत. काराव जि.प. गटात शेकापचे महादेव दिवेकर विरुध्द परशुराम पवार ही प्रेक्षणीय लढत आहे. पेणच्या ५ जि.प. गटात व पंचायत समितीच्या १० गणातील जागावर शेकापनेच खऱ्या अर्थाने राजकीय दंगल घडविली आहे.

Web Title: There is a multi-colored fight in Uran taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.