एम्प्लॉयमेंट आॅफिसमध्ये पाणी नाही

By admin | Published: November 18, 2016 02:57 AM2016-11-18T02:57:24+5:302016-11-18T02:57:24+5:30

शासकीय एम्प्लॉयमेंट आॅफिसचा पाणीपुरवठा दोन वर्षांपासून खंडित आहे.

There is no water in the employment office | एम्प्लॉयमेंट आॅफिसमध्ये पाणी नाही

एम्प्लॉयमेंट आॅफिसमध्ये पाणी नाही

Next

ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कार्यरत असलेल्या शासकीय एम्प्लॉयमेंट आॅफिसचा पाणीपुरवठा दोन वर्षांपासून खंडित आहे. याशिवाय, डागडुजी होत नसल्यामुळे कार्यालयास अवकळा आली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) मागील दोन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, निष्काळजीपणामुळे ही वास्तू अद्यापही तहानलेली आहे.
शासकीय कार्यालयाच्या संपूर्ण देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पीडब्ल्यूडी विभागाची आहे. शासकीय एम्प्लॉयमेंट आॅफिस म्हणून ओळख असलेले हे कार्यालय आता कौशल्यविकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. मात्र, या कार्यालयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी २०१४ पासून पत्रव्यवहार करूनही पीडब्ल्यूडीकडून लक्ष देण्यात आलेले नाही. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना येताना घरूनच पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. याशिवाय, कार्यालयास स्वच्छतागृहाची सोय नसल्याने गैरसोय होते. (प्रतिनिधी)

Web Title: There is no water in the employment office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.