पनवेल : धावत्या स्कोडा गाडीच्या काचेवर चढलेल्या सापाला पनवेलमधील सर्पमित्राने जीवनदान दिले. मंगळवारी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली.
स्कोडा गाडीच्या चालकाला साप दिसल्यानंतर सायन-पनवेल महामार्गावर पनवेलजवळ रोडच्या शेजारी सिमरन मोटर्स या ठिकाणी चालकाने गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून बाहेर आला. यावेळी साप गाडीच्या बोनेटमध्ये आत जाऊन बसला होता. यादरम्यान गाडी समोर जास्त प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. चालक अक्षय नाईक यांनी गाडी थांबून बघितल्यानंतर गाडीत साप गेलाय हे त्याला समजले.
अक्षय याने लगेचच सेव्ह वाईल्ड लाईफ टीम पनवेल सर्पमित्र तेजस उलवेकर यांना फोन केला. लगेचच तेजस उलवेकर साप रेस्कुसाठी पोहचले. गाडीच्या बोनेटमध्ये साप बसला होता. या सापाला कोणत्याही प्रकारची ईजा न होता. सहजरित्याबाहेर काढून जवळच्या जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र तेजस उलवेकर यांनी सांगितले.