शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सेनेत निष्ठावंत-उपरे वाद वाढला

By admin | Published: April 28, 2017 12:41 AM

स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना

नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना जावून आलेलेही आम्हीच निष्ठावंत असल्याचे दावे करू लागले आहेत. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नेत्यांमध्ये संघटनेचे नुकसान करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये सामान्य शिवसैनिक भरडला जावू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबई शिवसेनेने पहिल्यांदा गट - तट बाजूला ठेवून राजन विचारे यांचा प्रचार केला. यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघामध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले होते. परंतु हीच एकी कायम ठेवण्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीमध्ये विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या प्रचारामध्ये समन्वय नसल्याने वातावरण चांगले असताना दोन्ही मतदार संघामध्ये थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. महापालिका निवडणुकीमध्ये तर मतभेद प्रचंड वाढले व त्याचमुळे पालिकेवर भगवा फडकण्याचे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. निवडणुकीनंतरही पक्षातील मतभेद अद्याप कमी झाले नाहीत. गतवर्षी एकीचे उसने अवसान आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविले असले तरी त्याचा पक्षवाढीसाठी काहीही फायदा झालेला नाही. उलट स्थायी समिती सभापती यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात घेतलेल्या भूमिकेचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच फायदा झाला. आता पुन्हा स्थायी समिती निवडणुकीवरून पक्षातील मतभेद प्रचंड वाढले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा या गटामध्ये शिवसेना विभागली आहे. पक्षांतर्गत मतभेद प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू झाले आहे. वरिष्ठांच्या भांडणामध्ये सामान्य शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. स्थायी समिती सदस्य निवडीवरून १८ नगरसेवक राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु यामधील एकाही नगरसेवकाने प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही. अशाप्रकारे धाडस करण्याचे सामर्थ्य यापैकी एकामध्येही नसल्याने हे फक्त दबाव निर्माण करण्यासाठीच असल्याचे मत एक गटाकडून करण्यात येत होते. पक्षामध्ये निष्ठावंत विरोधात उपरे असा वाद निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात शिवसेनेमध्ये निष्ठावंत कोणाला म्हणायचे व उपरे कोणाला म्हणायचे यावरूनच एकवाक्यता नाही. पालिका सभागृहातील निवडून आलेले ३८ व दोन स्वीकृतमधील हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नगरसेवक मूळ संघटनेतील असून उर्वरित नगरसेवकांनी सवडीप्रमाणे पक्षांतर केले आहे. वास्तविक जो पक्षात आहे तो आपला असे समजून त्यांना पक्ष कार्यामध्ये सहभागी करून घेण्याऐवजी निष्ठावंत व उपरे वाद निर्माण करून पक्षाचे नुकसान केले जात असल्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.