शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महाराष्ट्र भवनाच्या आराखड्यात होणार बदल; विधिमंडळातील दालनात सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 8:36 AM

ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पाहावयास मिळणार आहेत. 

नवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनात अंतरिम सादरीकरण करण्यात आले. पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये  किंचित फेरबदल करून भव्य-दिव्य अशी निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने भूमिपूजन करावे, असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

या वास्तुची निविदा प्रक्रिया येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. या महाराष्ट्र भवनामधील प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बैठी पुतळा बसविण्यात येणार  आहे. या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक (१) शंतनू गोयल, मुख्य कार्यकारी अभियंता शीला करुणाकर, अधीक्षक अभियंता अर्जुन अनोसे, वास्तुविशारद हितेन शेट्टी, अभियंत्या तेजस्विनी पंडित यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

या असणार सुविधा 

महाराष्ट्र भवनाची वास्तु १२ मजल्यांची असून, यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या, अतिथीगृह दुहेरी शेअरिंगच्या  ७२, अतिथीगृह डबल बेडच्या ६८ तसेच एक्झिक्युटीव्ह १० अशा एकूण १६१ खाेल्या असणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिताही खोल्या असणार आहेत. त्याचबरोबर ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पाहावयास मिळणार आहेत.