बसमधून चोरी करणाऱ्यांना पकडले

By admin | Published: February 8, 2016 02:45 AM2016-02-08T02:45:42+5:302016-02-08T02:45:42+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिवसागणिक चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर फूडमाल

The thieves caught the bus | बसमधून चोरी करणाऱ्यांना पकडले

बसमधून चोरी करणाऱ्यांना पकडले

Next

खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिवसागणिक चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर फूडमाल हॉटेल येथे बस थांबल्यानंतर प्रवासी चहा, नाष्टा, जेवणासाठी गेल्यानंतर अनेक चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारे शिवनेरी बसमध्ये चोरी करताना दोन चोरट्यांना प्रवाशांनी रंगेहाथ पडकले.
६ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वा. या शिवनेरी बस क्र .एमएच०६ एस ९४३० मधून पुण्याकडे जाण्यासाठी खारघर येथून जलसंपदा विभागात सहा.मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असणारे गिरीश जोशी (५३, रा. खारघर, नवी मुंबई) हे आराम बसमधून प्रवास करत होते आणि बाजूच्या सीटवर त्यांची बॅग ठेवली होती. काही वेळातच त्यांना झोप लागल्याने बस खोपोली हद्दीतील फूडमॉल हॉटेलजवळ १२.३० वाजताच्या दरम्यान थांबली असता या बसमधून काही प्रवासी खाली उतरले असता त्याचाच फायदा घेत या बसमधील जोशी यांची सुटकेस घेऊन पलायन करत असताना येथील सुरक्षारक्षक याने त्या चोरांना हटकले. ते पलायन करू लागताच त्या ठिकाणी आरडाओरडा केल्याने प्रवासी व सुरक्षारक्षक यांनी त्या दोन चोरांना पाठलाग करून रंगेहाथ पकडले. यानंतर जोशी यांना काही वेळाने जाग आली असता त्यांची सुटकेस न दिसल्याने त्यांनी खाली उतरून चौकशी केली असता सारा घटनाक्र म लक्षात आला. सुरक्षारक्षकाजवळ असणारी त्यांची सुटकेस मिळाल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
या घटनेची खोपोली पोलिसांना माहिती देताच तत्काळ खोपोली पोलीस घटनास्थळी पोहचून या दोन जणांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: The thieves caught the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.