सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात सक्रिय असलेल्या वाहनचोर टोळ्यांनी मागील नऊ वर्षांत तब्बल ६,७२६ वाहने पळवली आहेत. त्यापैकी अवघ्या १,६४६ वाहनांचाच तपास लागू शकलेला आहे. तर चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये दुचाकी सर्वाधिक असून त्यांच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळजीची चोरट्यांनी संधी साधलेली आहे.
नवी मुंबईसह मुंबई, ठाणे परिसरात वाहनचोरीची समस्या गंभीर होत चालली आहे. एका शहरात चोरलेली वाहने दुसऱ्या शहरात बनावट कागदपत्राद्वारे विकली जात आहेत. अशा प्रकारच्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या अनेक टोळ्यांना यापूर्वी पोलिसांनी जेरबंद देखील केले आहे. परंतु वाहनचोरीच्या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय, राष्टÑीय तसेच स्थानिक टोळ्या सक्रिय असल्याने हे गुन्हे पूर्णपणे थांबू शकलेले नाहीत. अनेकदा हौस म्हणून देखील वाहनचोरी करून वापरानंतर त्या निर्जन ठिकाणी टाकून दिल्याचे प्रकार घडतात. मात्र अशा विविध प्रकारातून घडणाºया वाहनचोरीच्या गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढतच चालली आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील नऊ वर्षात ६७२६ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात जड अवजड वाहनांसह कार व दुचाकींचा समावेश असून, त्यापैकी अवघ्या १६४६ वाहनांचा शोध लागू शकलेला आहे. उर्वरित ५०८० वाहनांचा अद्याप पोलिसांना शोध लागू शकलेला नाही.नवी मुंबईसह लगतच्या परिसरातून चोरीला गेलेली वाहने परराज्यात आढळल्याचा प्रकार मागील काही वर्षात समोर आलेला आहे. तर काही राज्यांमधील निवडणुकांपूर्वी महाराष्टÑातून सर्वाधिक वाहनचोरी होत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याकरिता रस्त्यालगत, निर्मनुष्य ठिकाणी उभी असणारी वाहने चोरट्यांकडून लक्ष्य केली जातात. शहरात आजवर वाहनचोरीच्या घडलेल्या घटनांमध्ये रस्त्यालगत, मोकळ्या मैदानात पार्क करून ठेवलेली वाहने सर्वाधिक चोरीला गेली आहेत. यामुळे अशा गुन्ह्यांना वाहनमालकांचा हलगर्जीपणा देखील कारणीभूत ठरत आहे. नऊ वर्षात चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ७६५ जड वाहने, १९०७ कार, तर ४०५४ दुचाकींचा समावेश आहे.
वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील प्रत्येक नोडमध्ये पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यापैकी गावठाणांमध्ये सर्वाधिक बिकट अवस्था असून, नव्याने विकसित झालेल्या नोडमध्ये देखील पार्किंगकडे प्रशासनाने पुरेसे लक्ष दिले नाही. परिणामी खेळाची मैदाने, रस्त्यालगतची जागा, रेल्वेस्थानकाबाहेरची जागा, पदपथ तसेच सोसायटी बाहेरच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पहायला मिळते. अशावेळी वाहनमालकांकडून वाहनांच्या सुरक्षेची पुरेसी खबरदारी घेतली जाणे आवश्यक असतानाही, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.महागड्या गाड्या खरेदीवर लाखो रुपये खर्च करणारे, वाहनांमध्ये ५ ते १० हजार रुपयांचे सेफ्टी गॅझेट बसवण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.सुरक्षेकडे दुर्लक्ष : दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, वाहनधारकांत असुरक्षितता, कारवाई करण्याची मागणीच्वाहन मालकांमध्ये वाहनांच्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता मागील काही वर्षांपासून पोलिसांमार्फत सातत्याने प्रयत्न होत आहेत.च्वाहनांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या साधनांचे प्रदर्शन देखील भरवले जाते. त्यामध्ये स्मार्ट गॅझेटसह नवनवीन लॉक पहायला मिळतात.च्साधारण २०० रुपयांपासून ते ५ ते १० हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत असते.