तिसऱ्या ‘अलिबाग मोटार शो’चा आज शुभारंभ
By admin | Published: December 23, 2016 03:23 AM2016-12-23T03:23:11+5:302016-12-23T03:23:11+5:30
गेल्या दोन वर्षांपासून कार आणि मोटारसायकल शौकिनांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या ‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत
अलिबाग : गेल्या दोन वर्षांपासून कार आणि मोटारसायकल शौकिनांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या ‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चा शुभारंभ शुक्रवारी संध्याकाळी अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील जे. एस. एम. कॉलेज मैदानावर होणार आहे.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह आणि पीएनपी एज्युकेशन सोयायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती सॉलिटेअर इव्हेंटचे संचालक गिरीष जैन यांनी दिली आहे. टीबीझेड ज्वेलर्स आणि निशिलिन टायर्स हे असोसिएट पार्टनर तर रेडीओ पार्टनर रेडीओ मिर्ची असलेल्या ‘अलिबाग मोटार शो’ची तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार शौकिनांकरिता येथे मर्सिडिझ, जॅग्वार, लॅन्डरोव्हर, आॅडी, नेक्सा, आयसुझू, स्कॉडा, फोक्सव्हॅगन, निसान या विदेशी एकूण १८ कार्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर मोटारसायकल शौकिनांकरिता हर्ले डेव्हिसन, ट्रायम्स आणि रॉयल इन्फिल्ड या ११ मोटारसायकल्स उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती संयोजक सहयोगी भावार्थ शाह यांनी दिली आहे.
एकाच वेळी विविध विदेशी कार-मोटारसायकल्स नागरिकांना या शोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कार आणि मोटारसायकल्स बाबतची तांत्रिकसह अन्य सर्व माहिती येथे नागरिकांना देण्यात येणार आहे. पूर्णपणे मुक्त प्रवेश असलेल्या या ‘मोटार शो’मध्ये अलिबाग व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन जैन यांनी केले आहे. (विशेष प्रतिनिधी)