शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तिसऱ्या ‘अलिबाग मोटार शो’चा आज शुभारंभ

By admin | Published: December 23, 2016 3:23 AM

गेल्या दोन वर्षांपासून कार आणि मोटारसायकल शौकिनांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या ‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत

अलिबाग : गेल्या दोन वर्षांपासून कार आणि मोटारसायकल शौकिनांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या ‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चा शुभारंभ शुक्रवारी संध्याकाळी अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील जे. एस. एम. कॉलेज मैदानावर होणार आहे.अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह आणि पीएनपी एज्युकेशन सोयायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती सॉलिटेअर इव्हेंटचे संचालक गिरीष जैन यांनी दिली आहे. टीबीझेड ज्वेलर्स आणि निशिलिन टायर्स हे असोसिएट पार्टनर तर रेडीओ पार्टनर रेडीओ मिर्ची असलेल्या ‘अलिबाग मोटार शो’ची तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.कार शौकिनांकरिता येथे मर्सिडिझ, जॅग्वार, लॅन्डरोव्हर, आॅडी, नेक्सा, आयसुझू, स्कॉडा, फोक्सव्हॅगन, निसान या विदेशी एकूण १८ कार्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर मोटारसायकल शौकिनांकरिता हर्ले डेव्हिसन, ट्रायम्स आणि रॉयल इन्फिल्ड या ११ मोटारसायकल्स उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती संयोजक सहयोगी भावार्थ शाह यांनी दिली आहे. एकाच वेळी विविध विदेशी कार-मोटारसायकल्स नागरिकांना या शोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कार आणि मोटारसायकल्स बाबतची तांत्रिकसह अन्य सर्व माहिती येथे नागरिकांना देण्यात येणार आहे. पूर्णपणे मुक्त प्रवेश असलेल्या या ‘मोटार शो’मध्ये अलिबाग व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन जैन यांनी केले आहे. (विशेष प्रतिनिधी)