नवी मुंबई : दिघा परिसरात अनधिकृतपणे इमारती बांधणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पांडुरंग अपार्टमेंट प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन प्रकरणांमध्ये १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सिडको व एमआयडीसीच्या जमिनींवर तब्बल ९९ इमारती बांधण्यात आल्या आहेत. खोटी कागदपत्रे तयार करून या इमारतींमधील घरे सामान्य नागरिकांना विकण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाने या इमारती पाडण्याचे व बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पांडुरंग अपार्टमेंट इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर रमेश खारकर व किशोर कोळी या दोघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे दाखल होवू लागल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
दिघा अतिक्रमण प्रकरणी तिसरा गुन्हा
By admin | Published: October 20, 2015 11:53 PM