लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाच्या सुधारित नियमावलीमुळे नवी मुंबईमधील कंटेनमेंट झोनची संख्या १११ वरून ३० वर आली आहे. सर्वाधिक ११ कंटेनमेंट झोन तुर्भे परिसरात आहेत. नियम शिथिल झाल्यामुळे अनेक ठिकाणी बंद केलेले रोड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईमध्ये १३ मार्चला पहिला रुग्ण सापडला. एक रुग्ण सापडल्यानंतरही शहरात खळबळ उडाली होती. महानगरपालिका प्रशासनाने रुग्ण सापडलेल्या परिसरात जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. संपर्का$तील सर्वांना क्वारंटाइन केले व ५०० मीटर परिसर सील केला. यानंतर रुग्ण सापडला की शासन नियमानुसार ती इमारत सील करून ५०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. सानपाडामध्ये रुग्ण सापडल्यानंतर रेल्वे स्टेशनचा भुयारी मार्गही बंद करण्यात आला होता. १० ते १५ इमारती असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये एखादा रुग्ण सापडल्यानंतर सर्व इमारती सील केल्या जात होत्या. नवी मुंबईमधील कंटेनमेंट झोनची संख्या तब्बल १११ झाली होती.
सुधारित नियमावलीप्रमाणे सद्य:स्थितीमध्ये फक्त ३० ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. यामध्ये तुर्भेमध्ये ११, नेरूळमध्ये ६, ऐरोलीत ४, बेलापूर व घणसोलीत २, दिघामध्ये ३ तर वाशीसह कोपरखैरणेत प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे.
नवीन नियमाप्रमाणे एखाद्या इमारतीमध्ये रुग्ण सापडला तरी तेवढीच सदनिका सील केली जाते. त्या सोसायटीमधील इतर इमारती सील केल्या जात नाहीत. एखाद्या दुकानामध्ये रुग्ण सापडला तर त्याच्या डाव्या व उजव्या बाजूचे एक दुकान सील केले जात आहे. झोपडपट्टी व बैठ्या चाळींतही रुग्ण सापडलेले घरच सील केले जाते. एकापेक्षा जास्त रुग्ण आढळले असल्यास आरोग्य विभाग गांभीर्य लक्षात घेऊन परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करीत आहे. सुधारित नियमावलीमुळे अनेक ठिकाणी बंद केलेले रोड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये विनाकारण निर्माण होणारी भीती बंद झाली आहे.शहरातील विभागनिहाय कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणेबेलापूर विभागच्करावे गावच्दिवाळे गाव सेक्टर १४वाशी विभागच्सेक्टर १०, सेक्टर ११, जुहूगावकोपरखैरणे विभागच्साईदीप सोसायटी सेक्टर १९घणसोली विभागच्चिंचआळीच्सेक्टर १ घणसोलीनेरूळ विभागच्शिरवणे गावच्सेक्टर २३ जुईनगरजुईपाडा गावच्गांधीनगर एमआयडीसीच्शिवाजीनगरच्सेक्टर १४ प्लॉट २५३ कुकशेतच्सारसोळे सेक्टर ६ऐरोली विभागच्आदर्श चाळ सेक्टर १समता नगर चिंचपाडाच्पंचशील नगर,कातकरी पाडाच्ऐरोली गावतुर्भे विभागच्सेक्टर २१ तुर्भेच्इंदिरानगरच्सेक्टर २२ तुर्भेच्हनुमान नगरच्सेक्टर ४ ए सानपाडाच्ड्रम गल्ली तुर्भे स्टोअरच्सेक्टर २० तुर्भेच्सेक्टर १८ भरत शत्रुघ्न पॉवरच्आंबेडकर नगर, इंदिरा नगरच्अष्टविनायक चाळ पावणेदिघा विभागच्नामदेव वाडीच्बिंधू माधव नगर, संजय गांधी नगरच्ईश्वर नगर, इलठाणपाडा