थर्टी फर्स्टला ४२४ चालकांवर कारवाई , वर्षभरात ३७०० मद्यपींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:08 AM2018-01-02T07:08:11+5:302018-01-02T07:08:26+5:30
मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही चालकांना शिस्त लागत नसल्याने अवघ्या थर्टी फर्स्टच्या रात्रीत ४२४ मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.
मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा अपघातांमध्ये मृतांची संख्या वाढत असल्याने मद्यपान करून वाहन चालवणाºयांविरोधात पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. परंतु पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील मद्यपी चालकांना वाहतुकीची शिस्त अंगवळणी पडत नसल्याचे दिसत आहे. गतवर्षात वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या एकूण ३७०० कारवाया केल्या आहेत. त्यापैकी ४२४ कारवाया अवघ्या थर्टी फर्स्टच्या जल्लोषादरम्यान करण्यात आल्या आहेत. मद्यपींमुळे शहरातील उत्साही वातावरणात विघ्न येऊ नये याकरिता पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांकडून पहाटेपर्यंत गस्त सुरूहोती. यादरम्यान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यरात्रीपर्यंत शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. तर शहर पोलिसांसह वाहतूक शाखेच्या २३ अधिकारी व ३३५ कर्मचाºयांमार्फत आवश्यक ठिकाणांसह चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याशिवाय ३६५ ठिकाणी बॅरीगेट्स लावून मद्यपी चालकांकडून भरधाव वेगात वाहने चालवली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जात होती. त्यामध्ये पामबीच मार्गासह शहरातील इतर महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर वाहनांची झडाझडती घेऊन ४० ब्रीथ अॅनालायझर्स मशिनद्वारे वाहनचालकाने मद्यपान केले आहे का याची तपासणी करण्यात आली. या वेळी ४२४ चालकांनी मद्यपान केल्याचे आढळले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असल्याचे उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. २०१६मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्रीत ३१५ कारवाया करण्यात झालेल्या असून यंदा त्यात १०९ने भर पडली आहे.
बेशिस्त वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यातच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत २४६२ कारवाया करण्यात आल्या होत्या. मद्यपान करून वाहन चालवणे, विना हेल्मेट, काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट अशा विविध गुन्ह्यांखाली या कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील चालकांमध्ये सुधार नसल्याचे दिसत आहे.
सूर्यकांत वाघमारे

मद्यपीकडून पोलिसाला मारहाण
थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाया सुरू होत्या. यादरम्यान सानपाडा येथे राहणारा संजित गोपाल दास हा दुचाकीवर ट्रिपलसिट बसून नेरूळ पोलीस ठाण्यात गेला होता.
मद्यपान केल्याने पोलिसांनी पकडलेल्या एका मित्राला सोडवण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला होता. परंतु दास हाच मद्यपान करून ट्रिपलसिट आलेला असल्याने पोलिसांनी त्याचीही चाचणी घेऊन गुन्हा दाखल करण्याला सुरुवात केली.
यावेळी त्याने हुज्जत घालून एका हवालदाराला मारहाण केली. या प्रकरणी त्याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपुत यांनी सांगितले.
ंया कारवायांमध्ये सर्वाधिक ८३ कारवाया तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत झाल्या आहेत. तर सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेल्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीत एकही कारवाई झालेली नाही.