शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

थर्टी फर्स्टला ४२४ चालकांवर कारवाई , वर्षभरात ३७०० मद्यपींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 7:08 AM

मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही चालकांना शिस्त लागत नसल्याने अवघ्या थर्टी फर्स्टच्या रात्रीत ४२४ मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा अपघातांमध्ये मृतांची संख्या वाढत असल्याने मद्यपान करून वाहन चालवणाºयांविरोधात पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. परंतु पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील मद्यपी चालकांना वाहतुकीची शिस्त अंगवळणी पडत नसल्याचे दिसत आहे. गतवर्षात वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या एकूण ३७०० कारवाया केल्या आहेत. त्यापैकी ४२४ कारवाया अवघ्या थर्टी फर्स्टच्या जल्लोषादरम्यान करण्यात आल्या आहेत. मद्यपींमुळे शहरातील उत्साही वातावरणात विघ्न येऊ नये याकरिता पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांकडून पहाटेपर्यंत गस्त सुरूहोती. यादरम्यान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यरात्रीपर्यंत शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. तर शहर पोलिसांसह वाहतूक शाखेच्या २३ अधिकारी व ३३५ कर्मचाºयांमार्फत आवश्यक ठिकाणांसह चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याशिवाय ३६५ ठिकाणी बॅरीगेट्स लावून मद्यपी चालकांकडून भरधाव वेगात वाहने चालवली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जात होती. त्यामध्ये पामबीच मार्गासह शहरातील इतर महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर वाहनांची झडाझडती घेऊन ४० ब्रीथ अ‍ॅनालायझर्स मशिनद्वारे वाहनचालकाने मद्यपान केले आहे का याची तपासणी करण्यात आली. या वेळी ४२४ चालकांनी मद्यपान केल्याचे आढळले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असल्याचे उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. २०१६मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्रीत ३१५ कारवाया करण्यात झालेल्या असून यंदा त्यात १०९ने भर पडली आहे.बेशिस्त वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यातच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत २४६२ कारवाया करण्यात आल्या होत्या. मद्यपान करून वाहन चालवणे, विना हेल्मेट, काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट अशा विविध गुन्ह्यांखाली या कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील चालकांमध्ये सुधार नसल्याचे दिसत आहे.सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही चालकांना शिस्त लागत नसल्याने अवघ्या थर्टी फर्स्टच्या रात्रीत ४२४ मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा अपघातांमध्ये मृतांची संख्या वाढत असल्याने मद्यपान करून वाहन चालवणाºयांविरोधात पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. परंतु पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील मद्यपी चालकांना वाहतुकीची शिस्त अंगवळणी पडत नसल्याचे दिसत आहे. गतवर्षात वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या एकूण ३७०० कारवाया केल्या आहेत. त्यापैकी ४२४ कारवाया अवघ्या थर्टी फर्स्टच्या जल्लोषादरम्यान करण्यात आल्या आहेत. मद्यपींमुळे शहरातील उत्साही वातावरणात विघ्न येऊ नये याकरिता पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांकडून पहाटेपर्यंत गस्त सुरूहोती. यादरम्यान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यरात्रीपर्यंत शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. तर शहर पोलिसांसह वाहतूक शाखेच्या २३ अधिकारी व ३३५ कर्मचाºयांमार्फत आवश्यक ठिकाणांसह चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याशिवाय ३६५ ठिकाणी बॅरीगेट्स लावून मद्यपी चालकांकडून भरधाव वेगात वाहने चालवली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जात होती. त्यामध्ये पामबीच मार्गासह शहरातील इतर महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर वाहनांची झडाझडती घेऊन ४० ब्रीथ अ‍ॅनालायझर्स मशिनद्वारे वाहनचालकाने मद्यपान केले आहे का याची तपासणी करण्यात आली. या वेळी ४२४ चालकांनी मद्यपान केल्याचे आढळले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असल्याचे उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. २०१६मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्रीत ३१५ कारवाया करण्यात झालेल्या असून यंदा त्यात १०९ने भर पडली आहे.बेशिस्त वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यातच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत २४६२ कारवाया करण्यात आल्या होत्या. मद्यपान करून वाहन चालवणे, विना हेल्मेट, काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट अशा विविध गुन्ह्यांखाली या कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील चालकांमध्ये सुधार नसल्याचे दिसत आहे.मद्यपीकडून पोलिसाला मारहाणथर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाया सुरू होत्या. यादरम्यान सानपाडा येथे राहणारा संजित गोपाल दास हा दुचाकीवर ट्रिपलसिट बसून नेरूळ पोलीस ठाण्यात गेला होता.मद्यपान केल्याने पोलिसांनी पकडलेल्या एका मित्राला सोडवण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला होता. परंतु दास हाच मद्यपान करून ट्रिपलसिट आलेला असल्याने पोलिसांनी त्याचीही चाचणी घेऊन गुन्हा दाखल करण्याला सुरुवात केली.यावेळी त्याने हुज्जत घालून एका हवालदाराला मारहाण केली. या प्रकरणी त्याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपुत यांनी सांगितले.ंया कारवायांमध्ये सर्वाधिक ८३ कारवाया तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत झाल्या आहेत. तर सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेल्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीत एकही कारवाई झालेली नाही.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई