रोडपालीतील इमारती तहानलेल्या, पन्नास टक्के पाणीकपात, एकता सामाजिक सेवा संस्था रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:41 AM2017-09-12T06:41:18+5:302017-09-12T06:41:24+5:30

रोडपाली वसाहतीत दोन सेक्टरमधील उंच इमारतींना मागणीच्या तुलनेत पन्नास टक्केही पाणी मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी कमालीची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिडकोकडून पुरेशा उपाययोजना करण्यात येत नसल्याने रहिवासी एकता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.

Thirty-five percent of watercolors in the Road, and the Ekta Social Services Institute will be on the roads | रोडपालीतील इमारती तहानलेल्या, पन्नास टक्के पाणीकपात, एकता सामाजिक सेवा संस्था रस्त्यावर उतरणार

रोडपालीतील इमारती तहानलेल्या, पन्नास टक्के पाणीकपात, एकता सामाजिक सेवा संस्था रस्त्यावर उतरणार

Next

- अरूणकुमार मेहत्रे 
कळंबोली : रोडपाली वसाहतीत दोन सेक्टरमधील उंच इमारतींना मागणीच्या तुलनेत पन्नास टक्केही पाणी मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी कमालीची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिडकोकडून पुरेशा उपाययोजना करण्यात येत नसल्याने रहिवासी एकता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.
रोडपालीत १७, २० आणि १६ च्या काही भागात टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. १८ माळ्यापर्यंत टॉवर या ठिकाणी आहेत. खारघरच्या धर्तीवर हा परिसर विकसित करण्यात आला आहे. परंतु येथे पाण्याची खूपच टंचाई आहे. सेक्टर १७ आणि २० मधील जवळपास शंभर इमारतींना पाणी समस्या भेडसावत आहे. इमारती उंच असल्याने सदनिकांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे सिडकोकडून जितके पाणी मिळते ते रहिवाशांना पुरत नाही. काही ठिकाणी पिण्यापुरतेही पाणी येत नसल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. साठवण टाक्या कधी फुल्ल भरत नसल्याचेही ते म्हणाले. या ठिकाणी आयुष्याची कमाई खर्च करून आम्ही घरे खरेदी केली पण पाण्यामुळे खूपच अडचणीत सापडलो आहे. त्यामुळे हे घर रिकामे ठेवून आम्ही पनवेलला राहत असल्याचे नीलकंठ टॉवरमधील रहिवासी लता घुमे यांनी सांगितले. पाण्याशिवाय दुसरे काहीच महत्त्वाचे नाही ते जीवन आहे. आणि तेच नसेल तर केलेली गुंतवणूक चुकीची नाही तर काय असा प्रश्न प्रेम ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
सेक्टर १४, १६ या ठिकाणी रो हाऊस आणि विविध सोसायट्या बेकायदेशीरीत्या पंप लावून पाणी खेचून घेतात. त्यामुळे साहजिकच पाण्याच्या समान वितरणावर परिणाम होतो. म्हणून सेक्टर १७ आणि २० पर्यंत पाण्याचे प्रेशर कमी होत असल्याचे अर्जुन जाधव यांचे म्हणणे आहे. मोटारपंपावर कारवाई करण्याकरिता सिडकोने सूचना दिल्या होत्या, परंतु कारवाई किती झाली हे अधिकाºयांनाच माहिती अशी संतप्त प्रतिक्रि या रोडपालीतून येत आहे.
सिडकोने रोडपालीत अगोदर जलवाहिन्या टाकल्या होत्या. त्यानंतर २६ जुलैचा पूर आला म्हणून भराव करण्यात आला. त्यावर इमारती उभ्या राहिल्या या कारणाने पाइपलाइन खाली राहिल्या, कमी दाबाने पाणी येण्यास ही गोष्ट सुध्दा कारणीभूत असल्याचे नीलेश दाबेराव यांचे म्हणणे आहे. काही सोसायट्यांनी सिडको वाहिन्या ज्या ठिकाणी आहेत त्या पातळीवर आपल्या अंतर्गत वाहिन्या टाकल्या. त्यामध्ये बºयाअंशी तोडफोड करावी लागली तसेच खर्च करावा लागला. मात्र फायदा फारसा झाला नसल्याचे रहिवाशांनी ‘लोकमत’ला सांगितले. एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने सिडकोविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संस्थेचे सचिव संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

रोडपाली टँकरवर
प्रशस्त रस्ते, टोलेजंग इमारती या सर्व गोष्टी पाहून रोडपाली परिसर स्मार्ट वाटतो. मात्र पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यामुळे टँकरव्दारे पाणी सोसायट्यांना विकत घ्यावे लागत आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात पैसे अदा करावे लागतात. वास्तविक पाहता मुबलक पाणी देणे सिडकोची जबाबदारी आहे. मग आम्हाला भुर्दंड का असा प्रश्न गांधारी जाधव या महिलेने विचारला आहे.

रोडपालीमधील काही सेक्टरमध्ये पुरेशा दाबाने पाणी जात नाही ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आमच्याकडे तक्र ारीही आल्या आहेत. त्यानुसार कलेक्शन क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पंपिंग सुध्दा करण्यात येणार आहे.
- चंद्रहार सोनकुसरे,
सहाय्यक कार्यकारी अभियंता,
सिडको

Web Title: Thirty-five percent of watercolors in the Road, and the Ekta Social Services Institute will be on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी