ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 07:41 AM2023-07-21T07:41:03+5:302023-07-21T07:41:34+5:30

पर्यावरणवाद्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

This is an alarm bell, when will the mining of mountains be banned? | ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : इर्शाळवाडीतील दरड दुर्घटना हा एक इशारा आहे. यामुळे डोंगरांच्या खोदकामावर तत्काळ बंदी घालण्याची विनंती पर्यावरणवाद्यांनी केली आहे. रायगड, ठाण्यासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांचा सविस्तर अभ्यास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.    

डोंगर उतारांवरची माती सैल होण्यास सततचे आणि उच्च तीव्रतेचे विस्फोट कारणीभूत असतात. त्यातून दरडी कोसळू शकतात, असे नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान (एसइएपी) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. नॅटकनेक्टचे कुमार यांनी आयआयटी/भारताचे भौगोलिक सर्वेक्षण यांच्या मदतीने डोंगरांवरच्या मातीच्या स्थितीचा सखोल अभ्यास करण्याचीदेखील विनंती केली आहे. शासनाने डोंगरांवर होणाऱ्या विस्फोटांमुळे झालेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा जलद गतीने अभ्यास केला पाहिजे, असे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले.

शासनाने नवी मुंबई, ठाणे, उरण आणि खोदकाम होणाऱ्या इतर सर्व स्थळांवरच्या परिस्थितीची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पर्यावरणवादी समूहांनी सर्व डोंगरांवर त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांसारख्या बांधकामांच्या स्थळांवर विस्फोटांच्या भूकंपीय प्रभावाच्या तपासणीची विनंती केली आहे.

येऊर, पारसिक हिलकडे लक्ष द्या!
 पारसिक हिल, येऊर हिल आणि खारघर टेकडीसारख्या दरड कोसळू शकणाऱ्या ठिकाणांकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. डोंगर आणि टेकड्यांना धक्का पोहाेचवता कामा नये, तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या सभोवताली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची आणि वृक्षतोडीची परवानगी देता कामा नये. 
 पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रभागांमधल्या आदिवासी व इतर कुटुंबांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेसारख्या प्रकल्पांतर्गत त्यांच्या सध्याच्या वसाहतींजवळ केले जाऊ शकते, असे कुमार यांनी सुचवले आहे.

Web Title: This is an alarm bell, when will the mining of mountains be banned?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.