शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 7:41 AM

पर्यावरणवाद्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : इर्शाळवाडीतील दरड दुर्घटना हा एक इशारा आहे. यामुळे डोंगरांच्या खोदकामावर तत्काळ बंदी घालण्याची विनंती पर्यावरणवाद्यांनी केली आहे. रायगड, ठाण्यासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांचा सविस्तर अभ्यास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.    

डोंगर उतारांवरची माती सैल होण्यास सततचे आणि उच्च तीव्रतेचे विस्फोट कारणीभूत असतात. त्यातून दरडी कोसळू शकतात, असे नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान (एसइएपी) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. नॅटकनेक्टचे कुमार यांनी आयआयटी/भारताचे भौगोलिक सर्वेक्षण यांच्या मदतीने डोंगरांवरच्या मातीच्या स्थितीचा सखोल अभ्यास करण्याचीदेखील विनंती केली आहे. शासनाने डोंगरांवर होणाऱ्या विस्फोटांमुळे झालेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा जलद गतीने अभ्यास केला पाहिजे, असे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले.

शासनाने नवी मुंबई, ठाणे, उरण आणि खोदकाम होणाऱ्या इतर सर्व स्थळांवरच्या परिस्थितीची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पर्यावरणवादी समूहांनी सर्व डोंगरांवर त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांसारख्या बांधकामांच्या स्थळांवर विस्फोटांच्या भूकंपीय प्रभावाच्या तपासणीची विनंती केली आहे.

येऊर, पारसिक हिलकडे लक्ष द्या! पारसिक हिल, येऊर हिल आणि खारघर टेकडीसारख्या दरड कोसळू शकणाऱ्या ठिकाणांकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. डोंगर आणि टेकड्यांना धक्का पोहाेचवता कामा नये, तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या सभोवताली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची आणि वृक्षतोडीची परवानगी देता कामा नये.  पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रभागांमधल्या आदिवासी व इतर कुटुंबांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेसारख्या प्रकल्पांतर्गत त्यांच्या सध्याच्या वसाहतींजवळ केले जाऊ शकते, असे कुमार यांनी सुचवले आहे.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस