सैनिकांसाठी पाठविल्या एक हजार राख्या; कामोठे दिशा महिला मंचचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:44 PM2020-07-22T23:44:42+5:302020-07-22T23:44:50+5:30

कोरोनामुळे घरात बसूनच काम

A thousand guards sent for the soldiers; Initiative of Kamothe Disha Mahila Manch | सैनिकांसाठी पाठविल्या एक हजार राख्या; कामोठे दिशा महिला मंचचा उपक्रम

सैनिकांसाठी पाठविल्या एक हजार राख्या; कामोठे दिशा महिला मंचचा उपक्रम

googlenewsNext

अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : सिमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना कामोठे येथील दिशा महिला मंचच्या महिलांनी तब्बल एक हजार हाताने बनवलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाºया सैनिकाप्रति प्रेम व्यक्त केले आहे. एक धागा शौर्याचा, एक धागा रक्षणाचा या उपक्रमांतर्गत कामोठे येथील महिलांनी घरीच राहून जालंधर पंजाब येथील युनिटमध्ये पोस्टाच्या साहाय्याने राख्या पाठविल्या आहेत.

जवानांना सण, उत्सव साजरा करण्यासाठी घरी येता येत नाही. त्यामुळे देशाचे रक्षण करणाºया सैनिकांना कामोठे येथील दिशा महिला मंचच्या बहिणींनी तब्बल एक हजार राख्या व शुभेच्छा पत्र पाठले आहेत. या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना प्रेरणा मिळावी.

या उद्देशाने एक धागा शौर्याचा, एक धागा रक्षणाचा हा उपक्रम राबवल्याचे, दिशा महिला मंचच्या अध्यक्षा नीलम आंधळे यांनी सांगितले. विद्या मोहिते, रेखा ठाकूर, खुशी सावर्डेकर, अनुप्रिता महाले, गीतांजली नायकोडी, भावना सरदेसाई, रीना पवार, दीपाली कपाते, सुरेखा आडे, शालू पांडे, अनुजा मस्के, सुवर्णा टेंगळे आदींनी राख्या बनवल्या.

Web Title: A thousand guards sent for the soldiers; Initiative of Kamothe Disha Mahila Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.