वाशीत योगशिबिराला हजारोंची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:39 AM2019-06-22T00:39:58+5:302019-06-22T00:40:06+5:30
वीर भद्रासन करण्याच्या जागतिक विक्र माचा प्रयत्न
नवी मुंबई : पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सिडको आर्ट आॅफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटिझन फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून शुक्र वार, २१ जून रोजी योगदिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेमार्फत उपस्थितांकडून सलग तीन मिनिटे ‘वीर भद्रासन’ करून घेऊन जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन जाहीर केल्यावर सन २०१५ पासून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात उत्तम आरोग्य आणि मनस्वास्थासाठी योगा केला जातो. नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्येही योगविद्येचा प्रचार व्हावा व त्यायोगे आरोग्य प्राप्त व्हावे, यासाठी सिडकोच्या वतीनेही २०१५ सालापासून वाशीत योगदिन या कार्यक्र माचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या कार्यक्र मात आर्ट आॅफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटिझन फाउंडेशन या संस्थेमार्फत उपस्थित नागरिकांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार इत्यादीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या सर्व योगा प्रकारांची प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली. या कार्यक्र माच्या निमित्ताने सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, विविध संस्थांचे सदस्य, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तरु ण तरु णी, ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षाचालकांना आरोग्य विम्याचे वाटप
दगदगीच्या जीवनात रिक्षाचालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून त्यांना एखादा आजार जडल्यास त्यावर होणाऱ्या उपचारासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या कार्यक्र माच्या निमित्ताने रिक्षाचालकांना पंतप्रधान आरोग्य विम्याचे वाटप करण्यात आले.
कांशीरामजी महाविद्यालयात योगदिन
रबाळे येथील कांशीरामजी महाविद्यालयात जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत त्यांच्याकडून प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली. माजी महापौर सुधाकर सोनावणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्या प्रसारक हायस्कूलमध्ये योगासने
धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक व्याधींना दूर ठेवण्यासाठी योगा हा एकमेव पर्याय असून, याबाबत विद्यार्थ्यांनाही माहिती व्हावी यासाठी बेलापूरमधील विद्या प्रसारक हायस्कूलमध्ये योगा कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.