महिनाभरात हजार बोअरवेल

By admin | Published: April 4, 2016 02:02 AM2016-04-04T02:02:44+5:302016-04-04T02:02:44+5:30

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली

Thousands of borses a month | महिनाभरात हजार बोअरवेल

महिनाभरात हजार बोअरवेल

Next

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली असून भूगर्भातील पाण्याची पातळी ४०० फुटांपर्यंत गेली आहे. तर, अनेक ठिकाणी बोअरवेलला पाणीच लागत नसल्याने एप्रिल-मे महिन्यांत पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिकेकडे पाण्याचा पर्यायी स्रोत नसल्याने त्यांना एमआयडीसीच्या मनमानी कारभारावर अवलंबून राहावे लागत आहे. पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी टंचाईची झळ कमी करण्यासाठी जुन्या बोअरवेल व हातपंपांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात तीन बोअरवेल खोदण्याला मान्यता दिली. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार एका प्रभागात सहापेक्षा जास्त बोअरवेल खोदण्यात येत आहे. पालिकेने एका महिन्यात ३०० पेक्षा जास्त तर लहान-मोठ्या कारखान्यांनी ७०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्याची चर्चा आहे.
>शहरातून बारमाही वाहणारी उल्हास नदी आहे. अशा वेळी नदीपात्रातून पाणी न उचलता किनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी आयुक्तांकडे होत आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून स्वत:चा पाणीस्रोत उभारण्याची मागणी पालिकेकडे होत आहे. नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्यावर पालिकेने वेळीच निर्बंध न घातल्यास भूगर्भातील पाणीपातळी ४०० फुटांपेक्षा जास्त खोल जाईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
> मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्याऐवजी जुन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. बहुतांश नवीन बोअरवेलला पाणी लागत नसल्याने पालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. मात्र, ज्या जुन्या बोअरवेल व हातपंपांना मुबलक पाणी आहे, त्यांची दुरुस्ती केल्यास टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा मिळेल. पालिकेने वेळीच कारवाई सुरू न केल्यास आंदोलनाचे शस्त्र पुुन्हा हाती घ्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Thousands of borses a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.