नवी मुंबई : इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतेची चळवळ सुरू केली आहे. रविवारी पहाटे आठ विभागातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सामुहीक शपथ सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते अशा हजारो नागरिकांनी एकत्र येवून शहर स्वच्छतेची शपथ घेतली.
स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या अंतर्गत पहाटे ८ वाजता प्रत्येक विभागात नागरिकांनी शपथ घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवून नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावली होती. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी, बचतगटांच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.
येथे घेण्यात आली शपथबेलापूर - राजीव गांधी क्रीडा संकुल सेक्टर ३ सीबीडी बेलापूर नेरूळ - ज्वेल्स ऑफ नवी मुंबई सेक्टर २६ नेरूळ वाशी - मॉडर्न महाविद्यालय मैदान वाशी सेक्टर १५तुर्भे -जयपुरीया स्कूल सेक्टर १८ सानपाडा कोपरखैरणे - निसर्ग उद्यान सेक्टर १४ कोपरखैरणे घणसोली - सेंट्रल पार्क सेक्टर ३ घणसोलीऐरोली - आर आर पाटील मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ऐरोली सेक्टर १५दिघा - नागरी आरोग्य केंद्रासमोरील पटांगण दिघा