बंदी झुगारून हजारो पर्यटक पांडवकड्यावर दाखल

By Admin | Published: June 26, 2017 01:38 AM2017-06-26T01:38:35+5:302017-06-26T01:38:35+5:30

पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना

Thousands of tourists hit on the Pandavakar | बंदी झुगारून हजारो पर्यटक पांडवकड्यावर दाखल

बंदी झुगारून हजारो पर्यटक पांडवकड्यावर दाखल

googlenewsNext

वैभव गायकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे. मात्र, पर्यटकांनी पहिल्या पावसातच बंदी झुगारून रविवारी धबधब्यावर मोठी गर्दी केली होती.
आजवर शेकडो पर्यटकांच्या जीवावर बेतलेल्या या धबधब्यावर वन विभागाने बंदी घातली आहे.
पर्यटकांची सुरक्षा धोक्यात येऊ नये, म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. याकरिता सुरक्षा भिंत बांधण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे. मात्र, धोका लक्षात न घेता, पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. सुमारे १००पेक्षा जास्त फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्यात मनमुराद भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. या ठिकाणी मुंबई, उपनगरांसह, ठाणे, कल्याण, भिवंडी, या शहरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
वनविभाग अथवा खारघर पोलिसांच्या वतीने कोणतीही सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात आली नसल्याने पर्यटकांनी या ठिकाणी प्रवेश केला.
शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेला पाऊस रविवारीही कोसळत होता. पांडवकड्यावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा वनविभागाकडून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.
पर्यटकांना थांबवण्यासाठी कोणतीच यंत्रणा या ठिकाणी नसल्याने बंदीचे नियम अनेकांनी पायदळी तुडवले.

Web Title: Thousands of tourists hit on the Pandavakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.