नायब तहसीलदारासह तिघे अटकेत
By admin | Published: June 20, 2017 01:35 AM2017-06-20T01:35:57+5:302017-06-20T01:35:57+5:30
उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकारी विजया जाधव, नायब तहसीलदार विकास पवार आणि शिपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/उल्हासनगर : उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकारी विजया जाधव, नायब तहसीलदार
विकास पवार आणि शिपाई
तानाजी पवार यांना चार लाखांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी त्यांनी ८० वर्षे वयाच्या वयोवृध्देकडे लाच मागितली होती.
उल्हासनगरातील कॅम्प नं-३ पवई चौकात उपविभागीय कार्यालय आहे. गेल्या ३० वर्षापासून एक वृद्ध महिला स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर सातबाराची नोंद करण्यासाठी या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित होती.
गरीब वृध्देची एका वकिलाला दया आली आणि त्यांनी तिचे प्रकरण विनामूल्य लढविण्यास घेतले. त्यादरम्यान जमिनीवर सातबारा चढविण्यासाठी उपविभागीय अधिकारी विजया जाधव, नायब तहसीलदार विकास पवार आणि शिपाई तानाजी पवार यांनी वृध्द महिलेच्या वकिलाकडे पाच लाखांची मागणी केली.
तडजोडीनंतर हा व्यवहार
चार लाख रुपयांत ठरला.
दरम्यान वकिलांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला.