रेल्वेरुळावर शिडी ठेवणा-या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:15 AM2017-08-13T00:15:40+5:302017-08-13T00:16:17+5:30
व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी चोरलेली शिडी तोडण्याकरिता रेल्वेरुळावर ठेवणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. तिघेही अल्पवयीन असून झोपडपट्टीत राहणारे आहेत.
नवी मुंबई : व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी चोरलेली शिडी तोडण्याकरिता रेल्वेरुळावर ठेवणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. तिघेही अल्पवयीन असून झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून, त्यांच्या कृत्यामुळे रेल्वेप्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.
ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर महापे पुलाखाली शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. वाशीच्या दिशेने जाणाºया रेल्वेमार्गावर रुळावर शिडी असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले. संभाव्य दुर्घटना टाळण्याकरिता प्रसंग सावधानता बाळगत, त्याने रेल्वे थांबवून रुळावरील शिडी हटवली. यानंतर, मोटरमनने सदर प्रकाराची माहिती रेल्वेसुरक्षा दलाच्या (आरपीएफ) तुर्भे विभागाला दिली होती. त्यानुसार, आरपीएफचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लोकेश सागर यांनी तपासाला सुरुवात केली होती. आरपीएफ कर्मचारी रामअशिष यादव, नीलेश दळवी व किसन सिंग यांना तत्काळ तपासाचे आदेश देण्यात आले होते. या वेळी कोपरखैरणे स्थानकापासून काही अंतरावर रुळावरून तिघे जण शिडी घेऊन येत असल्याचे आरपीएफ कर्मचाºयांच्या निदर्शनास आले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोघे जण पळून गेले, तर एक जण त्यांच्या हाती लागला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीअंती शनिवारी इतर दोघांनाही पकडण्यात आले असून, दोघे जण सख्खे भाऊ असल्याचे आरपीएफचे निरीक्षक लोकेश सागर यांनी सांगितले.
तिघेही १० ते १६ वयोगटातले असून, व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. त्यानुसार, व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी कोपरखैरणेतील एका हॉटेलबाहेरून अॅल्युमिनिअमची शिडी चोरली होती, परंतु चोरलेली शिडी जड असल्यामुळे ती तोडण्याकरिता ते महापे पुलाखाली आले होते. त्या ठिकाणी शिडी तोडण्याचा प्रयत्न करूनही न तुटल्याने त्यांनी ती रेल्वेरुळावर ठेवली. प्रथम रुळाच्या एकाच भागावर त्यांनी शिडी ठेवल्याने ती तुटली नाही.
मोटरमनलाही रुळावरील शिडी निदर्शनास आली नाही. मात्र त्यानंतर, तिघांनी सुमारे १७ फूट लांबीची शिडी दोन्ही रुळावर आडवी ठेवली असता, दुसºया मोटरमनचे लक्ष गेले. त्याने रेल्वे सुरक्षा दलाला त्याची माहिती दिली. मोटरमनच्या या सावधानतेमुळे संभाव्य मोठा रेल्वेअपघात टळल्याची भावना, आरपीएफचे निरीक्षक लोकेश सागर यांनी व्यक्त केली आहे.
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला
मोटरमनलाही रुळावरील शिडी निदर्शनास आली नाही. मात्र, त्यानंतर तिघांनी सुमारे १७ फूट लांबीची शिडी दोन्ही रुळावर आडवी ठेवली असता, दुसºया मोटरमनचे लक्ष गेले. त्याने रेल्वे सुरक्षा दलाला त्याची माहिती दिली. मोटरमनच्या या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा रेल्वेअपघात टळला़