‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तिघांना कुटुंब गवसले

By admin | Published: July 24, 2015 02:57 AM2015-07-24T02:57:32+5:302015-07-24T02:57:32+5:30

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तीन मुलांना कुटुंब मिळाले आहे, तर पाच बेवारस मुलांची

Three children were brought home by 'Operation Smile' | ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तिघांना कुटुंब गवसले

‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तिघांना कुटुंब गवसले

Next

नवी मुंबई : हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तीन मुलांना कुटुंब मिळाले आहे, तर पाच बेवारस मुलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामध्ये आईच्या त्रासाला कंटाळून पळालेल्या मुलाचाही पोलिसांनी शोध घेतला आहे.
‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने आजवर १८ मुलांचा शोध घेतला आहे. हरवलेल्या अथवा कुटुंबापासून दूर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा त्यात समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी पळालेल्या एका १५ वर्षीय मुलाला पोलिसांनी परत घरी आणले आहे. रबाळे येथे राहणारा श्याम चहार (१५) हा आईच्या वागण्यामुळे त्रस्त होता. आई मद्यपान करून शिवीगाळ करत असल्याचा मनस्ताप त्याला होत होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तो घर सोडून पळाला होता. त्यानंतर तो खारघर, पनवेल या ठिकाणी मिळेल ते काम करून स्वत:च्या गरजा भागवू लागला. तो उस्मानाबाद येथे मामाच्या गावीदेखील राहून आला. परंतु घरी जातो असे सांगून मुंबईला येऊनही तो आईकडे परत जात नव्हता. अखेर सोमवारी तो रबाळे एमआयडीसी पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची संयुक्त मोहीम सुरू असताना रबाळे स्टेशनलगत आढळला. ओळख पटताच त्याला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या त्याच्या आईला देखील पोलिसांनी समज दिली.
रबाळे येथूनच पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचाही शोध लागला आहे. मोहमद चांद सोहेल खान (७) हा दोन वर्षांचा असताना हरवला होता. त्याच्यासारखाच मुलगा भिवंडी बालसुधारगृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या पथकाने त्याचे आई - वडील उम्मतुलनिसार खान व सोहेल खान यांनाही त्याची माहिती सांगितली. त्यांनी बालसुधारगृहात जाऊन मोहमद खानची चौकशी केली असता त्याची ओळख पटली. त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Three children were brought home by 'Operation Smile'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.