शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तिघांना कुटुंब गवसले

By admin | Published: July 24, 2015 2:57 AM

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तीन मुलांना कुटुंब मिळाले आहे, तर पाच बेवारस मुलांची

नवी मुंबई : हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तीन मुलांना कुटुंब मिळाले आहे, तर पाच बेवारस मुलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामध्ये आईच्या त्रासाला कंटाळून पळालेल्या मुलाचाही पोलिसांनी शोध घेतला आहे.‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने आजवर १८ मुलांचा शोध घेतला आहे. हरवलेल्या अथवा कुटुंबापासून दूर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा त्यात समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी पळालेल्या एका १५ वर्षीय मुलाला पोलिसांनी परत घरी आणले आहे. रबाळे येथे राहणारा श्याम चहार (१५) हा आईच्या वागण्यामुळे त्रस्त होता. आई मद्यपान करून शिवीगाळ करत असल्याचा मनस्ताप त्याला होत होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तो घर सोडून पळाला होता. त्यानंतर तो खारघर, पनवेल या ठिकाणी मिळेल ते काम करून स्वत:च्या गरजा भागवू लागला. तो उस्मानाबाद येथे मामाच्या गावीदेखील राहून आला. परंतु घरी जातो असे सांगून मुंबईला येऊनही तो आईकडे परत जात नव्हता. अखेर सोमवारी तो रबाळे एमआयडीसी पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची संयुक्त मोहीम सुरू असताना रबाळे स्टेशनलगत आढळला. ओळख पटताच त्याला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या त्याच्या आईला देखील पोलिसांनी समज दिली.रबाळे येथूनच पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचाही शोध लागला आहे. मोहमद चांद सोहेल खान (७) हा दोन वर्षांचा असताना हरवला होता. त्याच्यासारखाच मुलगा भिवंडी बालसुधारगृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या पथकाने त्याचे आई - वडील उम्मतुलनिसार खान व सोहेल खान यांनाही त्याची माहिती सांगितली. त्यांनी बालसुधारगृहात जाऊन मोहमद खानची चौकशी केली असता त्याची ओळख पटली. त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.