शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

‘जलयुक्त’च्या कामासाठी तीन कोटीं

By admin | Published: April 28, 2017 12:19 AM

ग्रामीण भागातील डोंगर, दुर्गम भागात मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षी

रोहा : ग्रामीण भागातील डोंगर, दुर्गम भागात मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षी तीन गावातील ११५ कामांकरिता २ कोटी ५८ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद केली होती. यंदा या योजनेसाठी शासनाने रोहे तालुक्यावर मेहरनजर टाकली आहे. यावर्षी ४ गावातील १२६ विविध कामांकरिता ३ कोटी ६३ लाख २७ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. राज्य शासनाने नुकत्याच या कामांना मंजुरी देत निधीची तरतूद केली आहे. या अभियानाची वनखाते, कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा या शासनाच्या विभक्त खात्याची संयुक्त जबाबदारी असताना या अभियानाला खुद्द वनखात्याने खोडा घातला आहे. तर ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभाग या दोन्ही विभागांनी पूर्णपणे कानाडोळा केल्याने एकट्या कृषी विभागावर या अभियानाचा भार पडला आहे. या अभियानाकरिता शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असली तरी विविध खात्यांच्या इच्छाशक्तीअभावी पाण्यासारखे पुण्य मिळवून देणाऱ्या अभियानाला ब्रेक लावण्याचे काम वनसंपदा व जलसंपदा आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजना या विभागाकडून होत आहे.‘सर्वांसाठी पाणी’ हे ब्रीद हाती घेऊन राज्य शासनाने गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. २०१५-१६ या पहिल्या वर्षात रोहे तालुक्यातील विरझोली, खोपे (धोंडखार), पाथरशेत या तीन गावांचा समावेश होतो. तर यंदा वाली, पाटणसई- चिकणी, खांबेरे-टेमघर, भालगाव या चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लोकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून सिमेंट बंधारे, वळण बंधारे, मातीला बांध बांधणे, डोंगराळ आडवी चर, अनगड दगडी बांध आदी विविध कामे या अभियानाअंतर्गत करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे हे अभियान कृषी विभाग, वनखाते, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभाग या चार विभागांनी एकत्र येवून मार्गी लावण्याचे बंधनकारक असताना वनखाते, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभाग या विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने अनेक ठिकाणी कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. तर दुसरीकडे एकट्या कृषी विभागाच्या खांद्यावर भार पडल्याने जलयुक्त शिवार अभियानाचे काम कासव गतीने होत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.रोहा तालुक्यातील चिकणी-पाटणसई विभागातील ३ मंजूर सिमेंट बंधाऱ्यापैकी २ बंधाऱ्यांच्या कामांवर वनविभागाने हरकत घेतली आहे. तर उर्वरित एका कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने सुरक्षा रक्कम न भरल्याने हे काम कागदोपत्री रखडले आहे. या विभागात एकूण ५६ कामे मार्गी लावण्याची आशा होती व कामाकरिता १ कोटी २६ लाख ९६ हजार रू. अंदाजपत्रक तयार आहे. वाली येथील एकूण २२ कामांसाठी ७९ लाख ६२ हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार आहे. या कामांची निविदा प्रक्रि या सुरू आहे. भालगाव विभागात एकूण २६ कामे असून या कामांकरिता ७४ लाख १८ हजार रूपयांचे अंदाजपत्रक काढण्यात आले आहे. चणेराजवळील खांबरे, टेमघर या भागातील एकूण२२ कामांना मंजुरी देत ८२ लाख ५१ हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. एकंदरीत वरील नमूद चार गावांकरिता ३ कोटी ६३ लाख २७ हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.