सानपाडा, जुईनगर ते तुर्भेदरम्यान तीन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:44 PM2022-06-09T12:44:07+5:302022-06-09T12:44:33+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत ८०० एमटी रोड क्रेन वापरून हे काम पूर्ण केले जाईल. 

Three days special traffic block between Sanpada, Juinagar to Turbhe | सानपाडा, जुईनगर ते तुर्भेदरम्यान तीन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक 

सानपाडा, जुईनगर ते तुर्भेदरम्यान तीन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक 

Next

मुंबई : रोड ओव्हर ब्रिजच्या रुंदीकरणासह विविध पायाभूत कामांसाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री सानपाडा, जुईनगर ते तुर्भेदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत ८०० एमटी रोड क्रेन वापरून हे काम पूर्ण केले जाईल. 
१०, ११ आणि १२ जूनदरम्यान रात्री ११.३० ते सकाळी ६.३० पर्यंत नेरूळ/वाशी-कोपर खैरणे विभागात हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे वाशी/नेरुळ/पनवेलसाठी रात्री ११.०९ ते पहाटे ५.५३ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि रात्री ११.०९ ते सकाळी ६.०२ पर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील.

Web Title: Three days special traffic block between Sanpada, Juinagar to Turbhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.