मुंबई : रोड ओव्हर ब्रिजच्या रुंदीकरणासह विविध पायाभूत कामांसाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री सानपाडा, जुईनगर ते तुर्भेदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत ८०० एमटी रोड क्रेन वापरून हे काम पूर्ण केले जाईल. १०, ११ आणि १२ जूनदरम्यान रात्री ११.३० ते सकाळी ६.३० पर्यंत नेरूळ/वाशी-कोपर खैरणे विभागात हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे वाशी/नेरुळ/पनवेलसाठी रात्री ११.०९ ते पहाटे ५.५३ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि रात्री ११.०९ ते सकाळी ६.०२ पर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील.
सानपाडा, जुईनगर ते तुर्भेदरम्यान तीन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 12:44 PM