मुंबई एपीएमसीमधील तीन कर्मचारी निलंबित; बाजार समितीमध्ये खळबळ

By नामदेव मोरे | Published: November 21, 2023 09:58 PM2023-11-21T21:58:59+5:302023-11-21T21:59:30+5:30

सचिव पी एल खंडागळे यांनी ही कारवाई केली असून यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे.

Three employees of Mumbai APMC suspended; Excitement in the market committee | मुंबई एपीएमसीमधील तीन कर्मचारी निलंबित; बाजार समितीमध्ये खळबळ

मुंबई एपीएमसीमधील तीन कर्मचारी निलंबित; बाजार समितीमध्ये खळबळ

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील  शौचालय घोटाळाप्रकरणी तीन कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये एक उपसचिवांचा समावेश आहे.

फळ मार्केट मधील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ठेकेदार,  बाजार समिती कर्मचारी व एक संचालकाचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी उपसचिव विजय शिंगाडे व कर्मचारी दर्शन भोजनकर,  विलास पवार यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. सचिव पी एल खंडागळे यांनी ही कारवाई केली असून यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Three employees of Mumbai APMC suspended; Excitement in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.