नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शौचालय घोटाळाप्रकरणी तीन कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये एक उपसचिवांचा समावेश आहे.
फळ मार्केट मधील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ठेकेदार, बाजार समिती कर्मचारी व एक संचालकाचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी उपसचिव विजय शिंगाडे व कर्मचारी दर्शन भोजनकर, विलास पवार यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. सचिव पी एल खंडागळे यांनी ही कारवाई केली असून यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे.