पोहायला गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:25 AM2018-11-20T06:25:15+5:302018-11-20T06:25:26+5:30
रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म वाढविण्यासाठी केलेल्या खोदकामात साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या तीन मुलींचा सोमवारी बुडून मृत्यू झाला. रेशम हळदीशेठ धोसले (१३), रोहिता एरलाल धोसले (१०) व प्रतीक्षा परेशान धोसले (८) अशी त्यांची नावे आहेत.
पनवेल : रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म वाढविण्यासाठी केलेल्या खोदकामात साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या तीन मुलींचा सोमवारी बुडून मृत्यू झाला. रेशम हळदीशेठ धोसले (१३), रोहिता एरलाल धोसले (१०) व प्रतीक्षा परेशान धोसले (८) अशी त्यांची नावे आहेत. मूळच्या अमरावतीच्या असलेल्या या मुली मंगळुरूला जायचे असल्याने सोमवारी पनवेलला आल्या होत्या. त्यांचे वडील रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करतात.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ ला लागून प्लॅटफॉर्म वाढविण्याचे व सबवेचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठा खड्डा खोदला असून, यात पाणी साचले आहे. या तीन मुली दुपारी रेल्वे स्थानकालगत मोकळ्या जागेत खेळत होत्या. या वेळी पोहण्यासाठी रेशम, रोहिता, प्रतीक्षा तिघी पाण्यात उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघींचा बुडून मृत्यू झाला. लोकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.