भाजपच्या तीन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:43 AM2020-03-15T03:43:33+5:302020-03-15T03:44:04+5:30
भाजपचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर, माजी परिवहन सभापती चंद्रकांत आगोंडे व अशोक नरबागे यांनी शनिवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर, माजी परिवहन सभापती चंद्रकांत आगोंडे व अशोक नरबागे यांनी शनिवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रकांत आगोंडे यांची मुलगी कविता आगोंडे प्रभाग 80 मध्ये नगरसेवीका आहेत. अशोक नरबागे यांची पत्नी सुरेखा नरबागे या प्रभाग 103 मध्ये नगरसेवीका आहेत. या दोन्ही नगरसेवीका पदाचा राजीनामा देऊन लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. भोलानाथ ठाकूर हे दिघा प्रभाग 1 मधील माजी नगरसेवक आहेत. भाजपने घणसोली मधील शिवसेनेचे तीन नगरसेवक नुकतेच फोडले आहेत. यामुळे शिवसेनेनेही त्यांचे तीन प्रमुख पदाधिकारी फोडून जशास तसे उत्तर दिले आहे.