क्रीडांगणाचे राखीव भूखंड शिक्षण संस्थांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:48 AM2018-12-14T00:48:10+5:302018-12-14T00:48:25+5:30

शहरात एकही क्रीडांगण नसल्याने पालिकेच्या मार्फत सिडकोशी समन्वय साधून स्वतंत्र क्रीडांगण उभारण्याची मागणी नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

In the throats of the reserved ground for educational institutions of the playground | क्रीडांगणाचे राखीव भूखंड शिक्षण संस्थांच्या घशात

क्रीडांगणाचे राखीव भूखंड शिक्षण संस्थांच्या घशात

Next

पनवेल : खांदा कॉलनी पालिका क्षेत्रातील महत्त्वाचा भाग आहे. सिडकोने ही वसाहत वसविली आहे. विशेष म्हणजे, येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. सध्याच्या घडीला येथील लोकसंख्या एक लाखाच्या घरात गेली असून, शहरात एकही क्रीडांगण नसल्याने पालिकेच्या मार्फत सिडकोशी समन्वय साधून स्वतंत्र क्रीडांगण उभारण्याची मागणी नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

पालिकेच्या प्रभाग क्र मांक-१५ मध्ये खांदा वसाहतीत नागरिकांनी घरे खरेदी करण्यासाठी सिडकोने विविध आश्वासने दिली होती. यापैकी महत्त्वाचे आश्वासन म्हणजे शहरातील नागरिकांना क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचे होते. मात्र, कालांतराने सिडकोला त्याचा विसर पडला. विशेष म्हणजे, खांदा वसाहतीमधील क्रीडांगणासाठी राखीव असलेले भूखंडदेखील सिडकोने शिक्षण संस्थांच्या घशात घातले.
सध्याच्या घडीला खांदा वसाहतीमधील तरु णवर्गाला मैदान तसेच क्रीडांगण उपलब्ध नसल्याने त्यांना शहराबाहेर जावे लागत आहे. यामुळे होतकरू तरुण खेळाडूंची निराशा होत आहे. विशेष म्हणजे, शहरात काही ठिकाणी असलेल्या मैदानावर खासगी संस्था हक्क गाजवत आहेत. संबंधित मैदाने बंदिस्त केली जात असल्याने विशेषत: तरुणवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शहरातून उभरत्या खेळाडूंना वाव मिळण्याच्या दृष्टीने शहरात स्वतंत्र क्रीडांगण उभारण्याची गरज असल्याचे नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन सिडकोशी समन्वय साधून शहरात हे क्रीडांगण उभारावे, अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अमर पाटील उपस्थित होते. आयुक्त गणेश देशमुख यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत.

Web Title: In the throats of the reserved ground for educational institutions of the playground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.