आयकर, उत्पादन शुल्क विभागांची भरारी पथके
By admin | Published: May 2, 2017 03:35 AM2017-05-02T03:35:45+5:302017-05-02T03:35:45+5:30
पनवेल महापालिका निवडणूक अतिशय संवेदनशील होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श
वैभव गायकर / पनवेल
पनवेल महापालिका निवडणूक अतिशय संवेदनशील होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठी आयकर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांची पथके महापालिका क्षेत्रात दाखल झाली आहेत.
येत्या २४ मे रोजी पनवेल महापालिकेच्या २० प्रभागांतून ७८ जागांसाठी निवडणूक होत आहे. राजकीय नेते आचारसंहितेचे उल्लंघन करून मतदारांना विकत घेण्याचा मार्ग अवलंबण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी प्राप्त झाली आहे. यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. अनेक कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेले होते. पनवेल महापालिका क्षेत्रात आयकर खात्याचे अधिकारी त्यांच्या पथकासह दाखल झाले आहेत. ते त्यांच्या पद्धतीने माहिती घेत आहेत. काही गृहनिर्माण सोसायटीमध्ये त्यांनी सापळे रचले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने गृहनिर्माण सोसायटीतील मतदारांच्या संपर्कात राहून तेथील हालचालींवर आयकर खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. काही बँक खात्यांवर होणाऱ्या मोठ्या रकमेच्या उलाढालींची माहिती आयकर खाते घेत असल्याचे सांगितले. राज्य उत्पादन शुल्क खात्याने पनवेल आणि परिसरातील दारूविक्र ी दुकाने, बार, धाब्यावरील दररोज होणाऱ्या विक्र ीची तपशीलवार माहिती घेणे सुरू केले आहे. धाबे, हॉटेल आणि फार्म हाउसवर होणाऱ्या ओल्या पार्टीवर नजर ठेवली आहे. आयकर खाते, राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांच्या निवडणुकीसंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल दररोज राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येत आहे.
पनवेलमधील एका सामाजिक संस्थेने राज्य निवडणूक अयोगाकडे तक्रार करून आदर्श आचारसंहिता राबविण्याची जोरदार मागणी केली होती. निवडणुकीत अवैध मार्गाने होत असलेली जबरदस्ती आणि पैसेवाटप किंवा मतदार खरेदी, गुंडागर्दी करून दहशत माजवणे आदी प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आयोगाने मोठी व्यूहरचना आखली आहे. पोलिसांनी त्यांच्या गस्ती वाढविल्या आहेत. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधक करवाई करण्यास सुरु वात केली आहे.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने गृहनिर्माण सोसायटीतील मतदारांच्या संपर्कात राहून तेथील हालचालींवर आयकर खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. काही बँक खात्यांवर होणाऱ्या मोठ्या रकमेच्या उलाढालींची माहिती आयकर खाते घेत आहे.