लॉकडाऊनमुळे रंगभूमीवरील बॅक स्टेज कलाकारावर रिक्षा चालविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:25 AM2020-11-10T00:25:13+5:302020-11-10T07:07:56+5:30

पनवेलमध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विविध नाटकांचे प्रयोग चालत असतात.

Time to drive a rickshaw on the back stage performer on the stage due to lockdown | लॉकडाऊनमुळे रंगभूमीवरील बॅक स्टेज कलाकारावर रिक्षा चालविण्याची वेळ

लॉकडाऊनमुळे रंगभूमीवरील बॅक स्टेज कलाकारावर रिक्षा चालविण्याची वेळ

Next

- वैभव गायकर

पनवेल : सहा महिन्यांपासून जास्त काळ लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय गेले. याचा फटका रंगभूमीवरील बॅकस्टेज कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. रंगभूमीवर काम करणारे लाइटमॅन, नेपथ्यकार, सेट बदलविणारे कलाकार आदींसह विविध बॅकस्टेज कलाकार रंगभूमीवरील नाटक चांगले व्हावे, याकरिता मेहनत घेत असतात. नेहमी दुर्लक्षित राहिलेले घटक आजच्या घडीला आर्थिक विवंचनेत सापडले असून, भेटेल ते काम करण्याची तयारी या कलाकारांनी केली असून, अनेकांनी रिक्षा चालविण्यापासून, फटाके विक्री, भाजीविक्री, कंदील रांगोळी विक्री अशी कामेही सुरू केली आहेत.

पनवेलमध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विविध नाटकांचे प्रयोग चालत असतात. दोन दिवसांपूर्वी शासनाने रंगभूमीवरील कार्यक्रमांना परवानगी दिली असली, तरी अटी-शर्तींमुळे नाटक निर्माते हे सध्याच्या घडीला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढे धजावत नसल्याने, रंगभूमीवरील बॅकस्टेजचे काम करणारे कलाकार अद्यापही संकटात आहेत. सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी नाट्यगृहाच्या अर्ध्या क्षमतेनेच प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार आहे. 

Web Title: Time to drive a rickshaw on the back stage performer on the stage due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.