कोकण रेल्वेच्या चार गाड्यांच्या वेळेत बदल, काही गाड्या अंशत: रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:43 AM2024-01-15T11:43:32+5:302024-01-15T11:43:50+5:30
तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर याची माहिती घेऊनच घराबाहेर पडा.
नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या कुमटा-नंदीकुर आणि कुंदापुरा-नंदीकुर विभागात मालमत्तेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी १८ जानेवारीला अनुक्रमे तीन आणि दोन तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या चार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर, काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू (१६५८५) या मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा १७ जानेवारील सुरू होणारा प्रवास कुंदापुरा स्थानकावर अल्पावधीसाठी थांबेल, कुंदापुरा- मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशत: रद्द होईल. त्याचप्रमाणे मुर्डेश्वर-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू एक्स्प्रेसचा १८ जानेवारी रोजी सुरू होणारा प्रवास कुंदापुरा स्थानकापासून कमी असेल आणि मुर्डेश्वर-कुंदापुरा विभागादरम्यान तो अंशतः रद्द होईल.
प्रवासाला घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या
पनवेल-नगरकोईल जंक्शन (०६०७६) या गाडीचा १७ जानेवारी रोजी सुरू होणारा
प्रवास मडगाव-कुमटा विभागादरम्यान ३ तासांसाठी नियमित केला जाईल.
कोचुवेली-लोकमान्य टिळक (टी) (२२११४) एक्स्प्रेसचा १८ जानेवारी रोजी सुरू होणार प्रवास मंगळुरू जंक्शन येथे ६० मिनिटांसाठी नियमित केला जाईल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर याची माहिती घेऊनच घराबाहेर पडा.