- मयूर तांबडेपनवेल - पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज बिलापोटी साडेसात कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वीज बिलांची थकबाकी शून्यावर आणण्यासाठी महावितरणकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. अशात ग्रामपंचायतीकडे थकलेली कोट्यवधीची रक्कम कशी वसूल करायची असा प्रश्न महावितरणला सतावत आहे.महावितरण कंपनीकडून तालुक्यात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषी पंप, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे अशा विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा केला जातो. खासगी वापर व अन्य वसुली महावितरणकडे बऱ्यापैकी होत असतानाच सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांच्या थकबाकी वसुलीची समस्या निर्माण झाली आहे. पनवेल तालुक्यातील पथदिव्यांची थकबाकी करोडोंच्या घरात असल्याने त्याची वसुली करण्याचे आव्हान महावितरणकडे उभे ठाकले आहे. बहुतांशी ग्रामपंचायती ही रक्कम भरण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महावितरणसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.पनवेल तालुक्यात १७0 गावे, तसेच वाड्या व पाडे आहेत. यातील बहुतांशी गावे व वाड्यांमध्ये वीज पोहोचलेली आहे.४ गावांमध्ये दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत वीजपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यातील बहुतांशी गावात पथदिवे लावण्यात आलेले आहेत. तालुक्यातील न्हावा ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याची ४७ लाख ३ हजार ६५८ रु पयांची सर्वाधिक थकबाकी आहे. त्या खालोखाल कोल्ही ग्रामपंचायतीकडे २५ लाख १ हजार ७७५ थकबाकी असून सर्वात कमी म्हणजेच १२ हजार ६५२ रुपयांची थकबाकी गव्हाण ग्रामपंचायतीकडे आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीची ही करोडो रुपयांची थकबाकी वसुली कशी करायची, असा प्रश्न महावितरणला सतावत आहे.ग्रामपंचायतींकडे लाखो रुपयांची पथदिव्यांची थकबाकी आहे. या थकीत बिलाच्या वसुलीसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने तातडीने ही थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे.- चंद्रशेखर मानकर,अधीक्षक,महावितरण, वाशी मंडळ१0 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाºया ग्रामपंचायतीन्हावे, कोल्ही, देवीचापाडा, वलप, कोयनावेळे, पेंधर, तळोजा, वळवली, ओवळा, करंजाडे, आदई, दुन्द्रे, मोरबे, कानपोली, पारगाव, वावंजे, पडघे, पालेखुर्द, नेरे, चिपळे.
पथदिव्यांचे ७.५ कोटी ग्रामपंचायतींकडे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:55 AM