संस्थांनी थकविले भाडे

By admin | Published: August 4, 2015 03:05 AM2015-08-04T03:05:21+5:302015-08-04T03:05:21+5:30

शहरातील ११८ सामाजिक संस्था व व्यक्तींनी महापालिकेचे ४५ लाख ८० हजार रुपये भाडे थकविले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही भाडे दिले जात

Tired fares by institutions | संस्थांनी थकविले भाडे

संस्थांनी थकविले भाडे

Next

नवी मुंबई : शहरातील ११८ सामाजिक संस्था व व्यक्तींनी महापालिकेचे ४५ लाख ८० हजार रुपये भाडे थकविले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही भाडे दिले जात नसल्यामुळे महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आठवड्यांत थकीत रक्कम जमा न केल्यास त्यांची पालिकेच्या वास्तूमधून हकालपट्टी केली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात समाजमंदिर, व्यायामशाळा, प्रसाधनगृह व इतर वास्तू बांधल्या आहेत. अनेक वास्तू सिडकोकडून हस्तांतरीत केल्या आहेत. राजीव गांधी मैदान व इतर काही ठिकाणी पालिकेच्या मालकीचे गाळे आहेत. हे सर्व सामाजिक संस्था व व्यक्तींना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. संबंधितांनी वेळेवर भाडे देणे आवश्यक आहे. परंतु अनेकांनी २ ते ३ वर्षे एक रूपयाही भरलेला नाही. पालिकेच्या वास्तूंचा मोफत वापर सुरू केला आहे. थकबाकीची रक्कम ४५ लाख ८० हजार रूपये झाली आहे.स्वत:च्या मालकीची वास्तू असल्याप्रमाणे संबंधितांचे वर्तन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
संबंधितांनी दोन आठवड्यांत पैसे भरले नाहीत तर त्यांना पालिकेच्या जागेतून हाकलून देण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्या संस्था वेळेत पैसे भरतील त्यांना सहकार्य केले जाईल. जे पैसे थकवतील त्यांच्यावर कोणत्याही स्थितीमध्ये कारवाई करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला असून, त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

काही संस्थांची थकबाकीही लाखाच्या घरात गेली आहे. संबंधितांना महापालिकेने पैसे भरण्यासाठी वारंवार नोटीस दिली आहे. परंतु यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही.
थकबाकीदारांविरोधात महापालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे. त्यांची नावे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
विभागसंख्याथकीत
रक्कम
बेलापूर७८००३६
नेरूळ२१३०४८१३
वाशी१७४६०५६६
तुर्भे१७३२२४८७
कोपरखैरणे१३२१५४३६
ऐरोली१०१४८६८०
इतर३१२९५००५०

Web Title: Tired fares by institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.