विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव हवे, नामकरणासाठी भूमिपुत्रांचा सिडकोविरोधात एल्गार,प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:44 PM2022-06-25T13:44:47+5:302022-06-25T13:46:11+5:30

Navi Mumbai Airport: लोकनेते दि. बा. पाटील तळागाळातील सर्वधर्मीयांचे नेतृत्व करणारे क्रांतिकारी आणि लढवय्ये नेते होते, त्यामुळे नवी मुंबईच्या विमानतळाला येथील चार जिल्ह्यांतील भूमिपुत्र, तसेच इतर स्थानिक रहिवाशांचा दिबांच्या नावाला केवळ आग्रह नसून, अट्टाहास आहे.

To the airport Ba. Patil's name should be the same, Bhumiputra's Elgar against CIDCO for naming, | विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव हवे, नामकरणासाठी भूमिपुत्रांचा सिडकोविरोधात एल्गार,प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा

विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव हवे, नामकरणासाठी भूमिपुत्रांचा सिडकोविरोधात एल्गार,प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा

Next

नवी मुंबई : लोकनेते दि. बा. पाटील तळागाळातील सर्वधर्मीयांचे नेतृत्व करणारे क्रांतिकारी आणि लढवय्ये नेते होते, त्यामुळे नवी मुंबईच्याविमानतळाला येथील चार जिल्ह्यांतील भूमिपुत्र, तसेच इतर स्थानिक रहिवाशांचा दिबांच्या नावाला केवळ आग्रह नसून, अट्टाहास आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हेच, तर संपूर्ण देशाच्या कोनाकोपऱ्यांत त्यांचे युगपुरुषाच्या माध्यमातून अभिमानाने नाव घेतले जाते, असे प्रतिपादन आ. गणेश नाईक आणि सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी शुक्रवारी बेलापूर येथे सिडको घेराव आंदोलनात केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आमच्याच बापाचे म्हणजे लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव लागावे, यासाठी चार जिल्ह्यांतून राज्य सरकार आणि सिडकोविरोधात  संघर्षाची लढाई सुरू आहे. विमानतळ नामकरणप्रश्नी दिबांच्या स्मृतिदिनी हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडको घेराव आंदोलनात सहभाग घेतला  होता. बेलापूर उड्डाणपुलाखालून क्रोमाजवळून ब्रिजजवळ घेराव आंदोलनाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, जोपर्यंत आमच्या  लोकनेत्याचे म्हणजे आमच्या दिबांचे या विमानतळाला नाव लागत नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केल्याशिवाय आम्ही स्वस्थ  बसणार नाही. नवी मुंबईतून जे पहिले विमान उडेल, त्यावेळी त्या ठिकाणी दिबांच्या नावाच्या पाट्या लागल्या जातील. अगदी हवाई सुंदरीच्या मुखातून दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत म्हणून नाव पुकारतील. हे सुवर्ण दिन लवकरच पाहायला मिळतील. लवकरच भाजप सरकार येणार असल्यामुळे  येत्या अधिवेशनात हा विषय लावून धरून भूमिपुत्रांचे स्वप्न साकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, पनवेलच्या महापौर कविता चौटमल, उपमहापौर सीता पाटील, जगदीश गायकवाड, भारती पोवार, माजी खासदार संजीव नाईक, महेंद्र घरत, भूषण पाटील, माजी आमदार संदीप नाईक, दशरथ भगत, संतोष केणे, नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, डॉ. राजेश पाटील, मनोहर पाटील, गुलाब वझे, भूषण पाटील, पनवेलचे नगरसेवक विकास घरत, दीपक पाटील, शैलेश घाग, निशांत भगत, नंदराज मुंगाजी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, विमानतळाच्या नामांतरावरुन गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापलेले आहे. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्तावही सादर झाला होता. मात्र त्यालाही विरोध करण्यात आला आहे.

 गेल्या वर्षी २४ जूनला लोकनेते दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर, तसेच प्रकल्पग्रस्तांचा साडेबारा टक्के, गावठाण विस्तार योजना, तसेच प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेली सर्व घरे नियमित करावी. २५० किंवा ५०० मीटरची अट न ठेवता, सरसकट सर्व घरे नियमित करून, त्यांना मालकी हक्क दिला पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे माजी खासदार  रामशेठ ठाकूर  यांनी सांगितले.

  “ब्रास ब्रांडच्या तालावर लग्नाच्या वरातीप्रमाणे महिला मोठ्या संख्येने दिबांच्या गाण्यावर नाचत होत्या, तर काही आबालवृद्धांनी  प्रतिमा असलेता झेंडे घेऊन नाचण्याचा मोह आवरता आला नाही. एक ८४ वयाची आजीबाई झेंडा घेऊन सलग तासभर नाचत होती.”

Web Title: To the airport Ba. Patil's name should be the same, Bhumiputra's Elgar against CIDCO for naming,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.