आज मुंबईला धान्यपुरवठा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:49 AM2020-12-08T02:49:23+5:302020-12-08T02:49:53+5:30
नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. यामुळे देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत.
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मंगळवारी आयोजित बंदमध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी व कामगार सहभागी होणार आहेत. यामुळे एक दिवस मुंबईला भाजीपाला व धान्य पुरवठा होणार नाही.
नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. यामुळे देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. ८ डिसेंबरला भारत बंदचे आयोजन केले असून त्यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमधील व्यापारी संघटना, माथाडी कामगार संघटनाही सहभागी होणार आहेत.
बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी राज्यातील सर्व ३०५ बाजार समित्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारत बंद अता किती प्रतिसाद मिळणार हे उद्याच समजणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.