‘नवी मुंबई टॅलेण्ट हंट’ ची आज अंतिम फेरी
By admin | Published: November 10, 2016 03:45 AM2016-11-10T03:45:44+5:302016-11-10T03:45:44+5:30
शहरातील सर्वच स्तरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ‘नवी मुंबई टॅलेण्ट हंट २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई : शहरातील सर्वच स्तरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ‘नवी मुंबई टॅलेण्ट हंट २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते. अनघा इव्हेंट्स यांनी ‘लोकमत’च्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबईत केले होते. पाच महिने सतत प्राथमिक फेऱ्या संपन्न झाल्या. यामध्ये पाचशेच्यावर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वच वयोगटातील कलावंतांनी उत्तम प्रतिसाद दिला. गुरुवारी १० नोव्हेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता संपन्न होणाऱ्या अंतिम फेरीत १५० च्यावर प्रतियोगी आपली कला सादर करणार आहेत. यावेळी गायन, नृत्य, मिमिक्र ी, नाटिका, रॅप, लावणी, वाद्य जुगलबंदी, फॅशन शो असे अनेक कलागुण प्रेक्षकांना बघण्यास मिळेल. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्र मास उपस्थित राहणार आहेत.
सादरीकरणाला परीक्षक तसेच उपस्थित प्रेक्षक आपल्या मताद्वारे प्रथम, व्दितीय व तृतीय कलाकार ठरवतील. जिंकलेल्या प्रतियोगीस स्विस लाँड्रीच्या वतीने अनुक्र मे दहा हजार, साडेसात हजार रु पये व पाच हजार पारितोषिक देण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यास सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक उमेश चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
या कार्यक्रमालालोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, इम्तियाझ हुसैन, नीलेश साबळे, श्रीधर चारी, विकास सावंत, सिकंदर खान, अरु ण कदम, मोसमी तोंडवळकर, फराज शाली, ज्योती जहांगियानी, संगीता जहांगियानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
(प्रतिनिधी)