टोल कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नाही, खारघर टोल कंत्राटदाराचे पोलिसांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:34 AM2020-07-10T00:34:45+5:302020-07-10T00:35:17+5:30
टोल सुरू झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत असलेले हे कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे कारण पुढे करीत कंत्राटदार या कर्मचा-यांना तोंडीच तुम्ही कामावर येऊ नका, असे सांगू लागले.
पनवेल : लॉकडाऊनचे कारण पुढे करून सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर टोल वसूल करणा-या डीआर सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपनीने ३९ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा आरोप केला होता. कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे संबंधित कर्मचा-यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशा-यानंतर कंत्राटदारामार्फत पोलिसांना पत्र देऊन या कर्मचाºयांना कामावरून काढले नसल्याची सावध भूमिका घेतली आहे.
टोल सुरू झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत असलेले हे कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे कारण पुढे करीत कंत्राटदार या कर्मचाºयांना तोंडीच तुम्ही कामावर येऊ नका, असे सांगू लागले. एकीकडे कोविडच्या साथीत आपली जबाबदारी पार पडणाºया या कर्मचाºयांना एकाएकी कामावरून कमी केल्याचे सांगितल्यावर मोठा धक्का बसला.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत एकाएकी बेरोजगार झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचाºयांनी स्थानिक नगरसेवक अॅडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला. खारघर पोलीस, डीआर सर्व्हिसेस तसेच एमएसआरडीए आदींना या कर्मचाºयांनी आंदोलनाचे पत्र दिले होते. आंदोलनाच्या इशाºयानंतर टोल वसूल करणारी कंत्राटदार कंपनी डीआर सर्व्हिसेस यांनी पोलीस प्रशासन तसेच नगरसेवक अॅडव्होकेट नरेश ठाकूर यांना पत्र लिहून संबंधित कामगारांना कामावरून कमी केले नसल्याचा दावा केला आहे. कोविड काळात खबरदारी म्हणून टोलवर कर्मचारी संख्या १ ते ३ ने कमी केली असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाºयांचे थकीत वेतन, १६ महिन्यांचा पीएफ याबाबत कंत्राटदारामार्फत काहीच माहिती दिली गेली नसल्याने कर्मचाºयांची आंदोलनाची भूमिका कायम असल्याचे नगरसेवक ठाकू र यांनी सांगितले.
मागील सात वर्षांपासून टोलवर काम करणारे सर्व कर्मचारी स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत. वेगवेगळ्या पदांवर काम करणाºया ३९ कर्मचाºयांपैकी १७ कर्मचारी टोल सुरू झाल्यापासून तर २३ कर्मचारी मागील दोन वर्षांपासून काम करीत आहेत. मात्र, एकीकडे टोल वसुली सुरू असताना आमचा पगार कपात का केला जातो, असा प्रश्न या ठिकाणी कार्यरत असलेल्या जयेश ठाकूर या कर्मचाºयाने उपस्थित केला आहे. कोविड काळात टोल नाक्यावर तात्पुरत्या स्वरूपात कामगार कमी केले असले तरी आम्ही आजतागायत प्रामाणिकपणे आमचे काम केले आहे. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आम्ही आमची सेवा बजावली असल्याने आम्हाला नियमित पगार कंत्राटदार कंपनीने दिला पाहिजे. दरम्यान, कंत्राटदाराने आपली भूमिका मांडताना कोणत्याही कर्मचाºयाला कामावरून काढले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना कर्मचाºयांसह शासकीय यंत्रणेला अंधारात ठेवल्याचा आरोप नगरसेवक ठाकूर यांनी के ला. कामावरून काढून टाकले नाही, तर या कर्मचाºयांचे वेतन का रोखून धरण्यात आले आहे हे कंत्राटदार कंपनीने स्पष्ट करावे, असे ठाकू र यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनमध्ये कोणत्याही आस्थापनांमार्फत कर्मचाºयांवर अन्याय होणार नाही याकरिता शासनाचे निर्देश आहेत. मात्र, कंत्राटदार कंपनी लॉकडाऊनचे कारण पुढे करीत या कर्मचाºयांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. या कर्मचाºयांचे पगार रोखून धरले आहेत. आंदोलनाच्या इशाºयानंतर या कर्मचाºयांना कामावरून काढले नसल्याचा खुलासा कंत्राटदाराने केला आहे. तसे असल्यास या कर्मचाºयांना चालू महिन्याचे वेतन देण्यात यावे; अन्यथा आमची आंदोलनाची भूमिका ठाम आहे.
- अॅडव्होकेट नरेश ठाकूर, स्थानिक नगरसेवक