टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याकडून मारहाण; डोक्यात दगड घातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:03 PM2019-02-25T23:03:59+5:302019-02-25T23:04:06+5:30

सुटे पैसे नसल्याचे सांगितले असता कर्मचाºयाला शाहरु ख यांचा राग आल्याने त्याने वाद घालण्यास सुरवात केली व त्यांचे सोबत असलेल्या व्यक्तीने त्यांच्या हातातील दगडाने शाहरु ख यांच्या डोक्यात मारले.

Toll plowed by a stunned employee; Inserted the stone in the head | टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याकडून मारहाण; डोक्यात दगड घातला

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याकडून मारहाण; डोक्यात दगड घातला

पनवेल : खारघर टोल नाका येथील एका कर्मचाऱ्याने सुटे पैसे देण्याच्या कारणावरून कंटेनर चालकाशी वाद घालत त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. खारघर पोलिसांनी टोलवरील कर्मचाºयावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.


शाहरूख जामू खान (२२) हे एचआर ३८ टी २१३८ या क्र मांकाचा कंटेनर चालवितात. त्यांच्यासोबत शौकीन खान (राजस्थान) हा क्लिनर म्हणून काम करतो. रोहा येथून दिल्ली येथे कंटेनर घेवून जात असताना खारघर टोल नाका येथे कंटेनर आला असता टोलसाठी तेथील कर्मचाºयास शाहरु ख यांनी दोन हजार रु पये देवून पावती मागितली. यावेळी टोलवरील कर्मचाºयाने शाहरु ख यांच्याकडे सुट्या दोनशे रु पयांची मागणी केली.

यावेळी त्याला सुटे पैसे नसल्याचे सांगितले असता कर्मचाºयाला शाहरु ख यांचा राग आल्याने त्याने वाद घालण्यास सुरवात केली व त्यांचे सोबत असलेल्या व्यक्तीने त्यांच्या हातातील दगडाने शाहरु ख यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे शाहरु ख यांच्या डोक्यास जखम होवून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर टोलवरील लोकांनी शाहरु ख यांना खारघर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खारघर पोलिसांनी आरोपीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Toll plowed by a stunned employee; Inserted the stone in the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.